पाठीच्या मनक्याचे आजारव आयुर्वेदिय उपचार
पाठीच्या मनक्याचे आजारव आयुर्वेदिय उपचार आधुनिक जीवनशैली अंगीकारल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर याचे अनेक व गंभीर दुष्परीणाम दिसत आहे. पाठीच्या मनक्याचे आजार हे त्यापैकीच एक उदाहरण.मानदुखी , पाठ दुखी , कंबर दुखी या सर्वसाधारण वाटाणा-या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यामध्ये येत असतात. याची कारण मीमांसा केली असता यामागे अनेक कारणे दिसुन येतात , जसे Cervical - lumbar spondylitis, Cord Compression, Disc Bulge, Osteoporosis, Sciatica, Gout, सांधेवातइत्यादी . हीसर्व कारणे पाठीचा मनका , त्यातील गादी , त्याभोवती असणारे स्नायु , नसा यांच्याशी संबधीत आहेत. पाठीच्या मनक्याची रचना मोठी गजब आहे. छोटे-छोटे मनके एकमेकांवर स्नायुच्या साहाय्याने जोडलेले असतात , त्यामध्येआघात शोषण्यासाठी (Shock Absorption) गादी असते , मेंदुकडुन येणा-या नसायातुन बाहेर पडतात. याप्रमाणे एकमेंकावर अवलंबुन घट्ट अशी रचना तयार झालेली असते. या रचनेमध्ये थोडासा जरी बिघाड झाला तरी मान-पाठ-कंबरदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. कंबरेत दुखणे , पायांना मुंग्या येणे , सकाळी उठताना त्रास होणे , चालताना त्रास होणे किंवा चाल