Posts

Showing posts from August 16, 2018

निद्रा (झोप) SLEEP

Image
 #sleep #insomnia #treatmentforsleep #Ayurveda #Ayurvedatreatmentforsleep #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad #Cicardiancycle #Ayurvedapanchakarama #depression # निद्रा #झोप निद्रा (झोप)          जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) झोप ही निरोगी आयुष्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. आज जगभरात अनेक लोक झोप न येण्याच्या त्रासा पासुन त्रस्थ आहेत. रात्री योग्य वेळी पुरेषी झोप न झाल्यास शरीराचे नैसर्गिक चक्र (Cicardian Cycle) भिघडुन आनेक आजारांना आमंत्रण मिळते. या सर्व आजारांना आळा घालण्यासाठी झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे.            निद्रा शरीरधारणेस मदत करते व अरोग्याचे रक्षण करुन आरोग्यसंपन्नतेला हातभार लावते. दररोज सर्वसामान्यपणे सुर्योदयापुर्वी एक ते दीड तास आधी, सुमारे सात तासांची झोप पुर्ण होईल, अशा अंदाजाने प्रत्येक व्यक्तीने रात्री शरीरे व मनास टप्प्याटय्याने संपुर्ण  शांत करुन, स्वतःला निद्रेच्या स्वाधीन करावे.           जेव्हा मन व इन्द्रियेही थकतात, त्यावेळी स्रोतसे कफ़ाने आवृत होतात आणि इन्द्रिय त्यांच्या विषयापासुन निवृत होऊन, मनुष्य निद्रेच्या अधीन होतो.