Posts

Showing posts from September 18, 2019

तुमच्या सोरायसिस मागे तणाव हे कारण तर नाही ना?

Image
तुमच्या सोरायसिस   मागे  तणाव  हे कारण  तर  नाही ना ? सोरायसिस एक त्वचारोग आहे. इतर सर्वसामान्य त्वचारोगांसारखाच सुरुवातीला वाटणारा हा त्वचारोग मात्र अचानक गंभीर वळण घेऊ शकतो.   सर्वप्रथम सोरायसिस म्हणजे काय ते पाहूया.  मानवी त्वचेचे डोळ्यांनी न दिसणारे अनेक पातळ थर असतात. सर्वात वरचा थर हा परिपक्व असा थर असून संपूर्ण वाढ झालेल्या पेशी यात असतात. आतील सर्व अवयवांचे रक्षण करणे व तापमान नियंत्रण अशा महत्त्वाच्या कार्यात त्या मदत करतात. हा परिपक्व थर बनवण्यासाठी साधारण २१ ते २८ दिवस लागतात ; परंतु हे २८ दिवसांचे चक्र काही विशिष्ट कारणांमुळे ५ ते ७ दिवसांवर जेव्हा येऊन पोहोचते तेव्हा हा परिपक्व पेशीचा थरावर थर साचत जातो.त्यालाच ‘ सोरायसिस ’ असेम्हणतात. सोरायसिसचे प्रकार सोरायसिस या रोगाचे बरेच प्रकार आहेत. त्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारा प्रकार म्हणजे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उठणं. सोरायसिस झालेल्यांपैकी 80 टक्के लोकांमध्ये हाच प्रकार दिसून येतो. यामध्ये लालसर रंगाच्या चकत्या येतात. या चकत्या गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. चकतीचा पृष्ठभाग खडबडीत तर कधी पा