तुमच्या सोरायसिस मागे तणाव हे कारण तर नाही ना?
तुमच्या सोरायसिस मागे तणाव हे कारण तर नाही ना?
सोरायसिसचे प्रकार
सोरायसिस या रोगाचे बरेच प्रकार आहेत. त्यात सर्वांत
जास्त प्रमाणात आढळणारा प्रकार म्हणजे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उठणं. सोरायसिस
झालेल्यांपैकी 80
टक्के लोकांमध्ये हाच प्रकार दिसून येतो. यामध्ये लालसर रंगाच्या चकत्या येतात. या
चकत्या गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. चकतीचा पृष्ठभाग खडबडीत तर कधी
पांढऱ्या खवल्यांचा असतो. हे सफेद चंदेरी रंगाचे खवले सैलसर चिकटलेले असतात.
त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाजवल्यानंतर भुशाप्रमाणं खाली पडतात. त्वचेच्या
बाह्यपेशींचं (एपिडर्मिस) फारच जलदगतीनं विभाजन झाल्यामुळे त्वचा जाड होते. त्यामुळे
त्वचेवरून पातळ
पापुद्य्रासारखे खवले निघतात. चट्टे हे साधारणत: सर्वप्रथम कोपर, गुडघे, डोक्याची त्वचा
आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात दिसतात. काही रुग्णांमध्ये ते हळूहळू
अंगभर पसरतात.
याव्यतिरिक्त प्लाक सोरायसिस, गट्टेट सोरायसिस, एरीथ्रोडेमिक
सोरायसिस, इन्वर्स सोरायसिस हेदेखील प्रकार आहेत.
आजाराची कारणं
या आजाराचं सर्वात महत्त्वाचं आणि
सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारं कारण म्हणजे मानसिक ताण-तणाव,
दारू पिण्याचं वा सिगारेट ओढण्याचं व्यसन असणे.
मानसिक
ताण-तणाव हे सोरायसिस मधील महत्त्वाचं कारण
आहे. तणाव (स्ट्रेस) वाढला की प्रतिकार शक्ती खालावते व
सोरायसिस निर्माण होण्याची शक्यता अधिकच वाढते. मानसिक ताण-तणावामुळे शरीरामध्ये होना-या हार्मोनल बिखाडामुळे सोरियासीस निर्माण होण्याची शक्यता अधिकच वाढते. सोरियासिस रुग्णामध्ये ३७% - ७८% रुग्णांचा
आजार स्ट्रेसमुळे आणखी गंभीर होण्याची शक्यता अढळुन येते. त्याचबरोबर आजार बरा होण्याचा कालावधीही
वाढू शकतो. सोरायसिसमध्ये
त्वचेवर आलेल्या बदलामुळे मनावर मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजार
अधिकच बळावतो.
दि नॅशनल सोरायसिस फाउंडेशननुसार मानसिक
तणावाशी सोरायसिसचा जवळचा संबंध आहे. सोरियासिसचे
प्रमाण डिप्रेशन, स्ट्रेस, अँक्सिएटी असणाऱ्या
रुग्णांमध्ये दुप्पट दिसून येते. यामध्ये काही रुग्ण आत्महत्यांपर्यंत देखील जाऊ शकतात. एवढी
गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
आयुर्वेदीय
उपचार
आयुर्वेदामध्ये प्राचीन
काळापासून त्वचारोगांचा उल्लेख त्याची लक्षणे, कारणे व उपचारासहित आढळतो. आयुर्वेदाच्या
मदतीने आपण वाढलेला दोषांवर नियंत्रण मिळवण्यात
यशस्वी झालो तर सोरायसिसविरुद्धची लढाई जिंकू शकतो.
आयुर्वेदानुसार मानसिक ताण-तणावामुळे
शरीरामध्ये पित्त दोष व वात दोष मोठ्या प्रमाणात वाढतात. वाढलेला पित्त दोष
रक्तधातूला दूषित करून त्वचारोग निर्माण करतो व वाढलेला वातदोष त्वचेवर कोरडेपणा वाढवतो.
त्यामुळे वाढलेला तणाव सोरियासिस निर्माण करण्यास कारणीभूत ठरु शकतो.
आयुर्वेद उपचार त्वचारोगावर अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये आयुर्वेदीय औषधी जसे मंजिष्ठा, सारिवा, अमृता यांचा उपयोग व आयुर्वेदीय पंचकर्म वमन, विरेचन, रक्तमोक्षण, बस्ती, लेप उपचार आधींचा देखील अवस्थानुसार चांगला उपयोग दिसून येतो.
त्वचारोगावरील उपचारा बरोबर मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म जसे शिरोधारा, नस्य, मालीश-शेक, विरेचन, बस्ती इत्यादी उपचाराची गरज पडू शकते. त्याचप्रमाणे आयुर्वेदीय औषधी जसे शंखपुष्पी, ब्राम्ही, अश्वगंधा यांचा आजाराच्या अवस्थेनुसार अधिक फायदा दिसून येतो. याचबरोबर आहार-विहारातील बदल, जीवनशैली सुधारणा, योगा, ध्यान केल्यास या आजारातून सहजपणे बाहेर पडता येते.
ज्या व्यक्ती ताण-तणाव किंवा त्यामुळे
उद्भवणा-या त्वचाविकारांना
बळी पडत असेल त्यांनी
लवकरात लवकर आयुर्वेदीय उपचारांची कास धरणे आवश्यक आहे. दुर्लक्ष करून वेळ दवड्ल्यापेक्षा आयुर्वेदीय उपचारांचा पर्याय निवडणे अधिक उपयुक्त ठरू शकते. हे मात्र नक्की.
धन्यवाद
डॉ
.सचिन गायकवाड – पाटील
(M.D.),आयुर्वेद-पुणे
(M.D.),आयुर्वेद-पुणे
Comments
Post a Comment