Posts

Showing posts from 2019

जुनाट सर्दी अ‍ॅलर्जी वर आयुर्वेदिय उपचार

Image
सर्दी १२ आठवडय़ांपेक्षा अधिक टिकत असेल तर त्याला जुनाट सर्दी किंवा ‘ क्रॉनिक सर्दी ’ म्हणतात. जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अ‍ॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते.   काही व्यक्तींना विशिष्ट अशा आहार , वातावरण यांच्या संपर्काने अथवा सहवासाने वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागतो. उदा. शिंका येणे , डोळे लाल होणे , डोळे खाजणे , नाक वाहने इत्यादी. तेव्हा आपण त्या व्यक्तीला विशिष्ट अशा आहार , वातावरण याची अ‍ॅलर्जी आहे , असे समजतो. ‘ अ‍ॅलर्जी म्हणजे नक्‍की काय ?’ अ‍ॅलर्जी याचा व्यवहारात अर्थ ‘ सहन न होणे ’ विश्‍वातील सजीव किंवा निर्जीव ,   द‍ृश्य किंवा अद‍ृश्य अशा कोणत्याही पदार्थाची उदा. थंडपाणी , थंड हवा , धूळीकण इत्यादीपासून ते विशिष्ट कपडे , गंध , प्रकाश अन्‍नपदार्थ पर्यंत कोणत्याही घटकाची अ‍ॅलर्जी असू शकते. म्हणजेच असे त्रास देणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संबंधात आल्यानंतर तेथील पेशींना ते सहन होत नाहीत व परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्‍न होऊन शरीर असा पदार्थ नाकातून , घशातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच शिंका येतात किंवा ठसका लागतो ,

निद्रानाश - मधुमेहास आमत्रंण

Image
निरोगी आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तास झोप अत्यावश्यक असते. परंतु , बदलत्या जीवनशैलीमुळे , कामाच्या स्वरुपामुळे , स्पर्धेमुळे शरीराला पुरेशी झोप मिळणे दुरापास्त होत चालले आहे . त्यात टेलीव्हिजन , इंटरनेट आणि इतर मनोरंजनाची साधने अजुनच भर घालत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की, मधुमेह आणि निद्राविकाराचा संबंध काय ? खरंतर, निद्राविकारामुळे मधुमेह होण्याची शक्यता बळावते आणि मधुमेहामुळे निद्रेवर परिणाम होतो. अमेरिकन डायबीटीस असोसिएशनच्या अहावालानुसार, ५ तासापेक्षा कमी झोप घेणा-या व्यक्तींना डायबीटीस होण्याचा धोका जास्त असतो. नविन संशोधनानुसार निद्रानाशाचा त्रास असणा-या ४० वर्षाखालील व्यक्तीला टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. २८ , ००० व्यक्तींवर करण्यात आलेल्य संशोधनानुसार हा निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कमी झोप - मधुमेहाचे मुख्य कारण रात्री उशिरा झोपणं , रात्रपाळी करणं किंवा इतर काही कारणांमुळे पुरेशी झोप होत नसेल , तर भविष्यात मधुमेह होण्याचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावांमुळे इन्शुलिनचे कार्य बिघडते आणि अशा लोकांना मधुमेह होण्याचा मोठा धोक

तुमच्या मधुमेहामागे ‘स्ट्रेस’ हे तर कारण नाही ना?

Image
गेल्या काही वर्षांत सर्वत्र ज्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यापैकी एक म्हणजे ‘ मधुमेह ’ अर्थात ‘ डायबेटीस ’ .         रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे शरीराला आवश्यक असणा-या ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि मधुमेह होतो. सामान्य लक्षणे : मधुमेह झालेला असताना सुरुवातीच्या अवस्थेत लघवीला जास्त वेळा जावे लागते. रात्रीच्या वेळी लघवीला उठावे लागते , तहान जास्त लागते , वजन कमी वाटू लागते , अशक्‍तपणा व   निरुत्साह वाटतो , जननेंद्रियाच्या ठिकाणी खाज सुटणे , पायाला गोळे येणे , करटे उठणे अशी लक्षणे काहींना जाणवतात. मध्यमवयीन पुरुषांमध्ये संभोग इच्छा कमी होणे व काही प्रमाण

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

Image
आधुनिक जीवनशैली अंगीकारल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर याचे अनेक व गंभीर दुष्परीणाम दिसत आहे. पाठीच्या मनक्याचे आजार हे त्यापैकीच एक उदाहरण. मानदुखी , पाठ दुखी , कंबर दुखी या सर्वसाधारण वाटाणा-या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यामध्ये येत असतात. याची कारण मीमांसा केली असता यामागे अनेक कारणे दिसुन येतात , जसे Cervical - lumbar spondylitis, Cord Compression, Disc Bulge, Osteoporosis, Sciatica, Gout, सांधेवात इत्यादी . ही सर्व कारणे पाठीचा मनका , त्यातील गादी , त्याभोवती असणारे स्नायु , नसा यांच्याशी संबधीत आहेत. पाठीच्या मनक्याची रचना मोठी गजब आहे. छोटे-छोटे मनके एकमेकांवर स्नायुच्या साहाय्याने जोडलेले असतात , त्यामध्ये आघात शोषण्यासाठी (Shock Absorption) गादी असते ,   मेंदुकडुन येणा-या नसा यातुन बाहेर पडतात. याप्रमाणे एकमेंकावर अवलंबुन घट्ट अशी रचना तयार झालेली असते. या रचनेमध्ये थोडासा जरी बिघाड झाला तरी मान-पाठ-कंबरदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. कंबरेत दुखणे , पायांना मुंग्या येणे , सकाळी उठताना त्रास होणे , चालताना त्रास  होणे किंवा चालता न येणे , पायाच्या मागील बाज