Posts

Showing posts from October 19, 2019

तुमच्या मधुमेहामागे ‘स्ट्रेस’ हे तर कारण नाही ना?

Image
गेल्या काही वर्षांत सर्वत्र ज्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यापैकी एक म्हणजे ‘ मधुमेह ’ अर्थात ‘ डायबेटीस ’ .         रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे शरीराला आवश्यक असणा-या ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि मधुमेह होतो. सामान्य लक्षणे : मधुमेह झालेला असताना सुरुवातीच्या अवस्थेत लघवीला जास्त वेळा जावे लागते. रात्रीच्या वेळी लघवीला उठावे लागते , तहान जास्त लागते , वजन कमी वाटू लागते , अशक्‍तपणा व   निरुत्साह वाटतो , जननेंद्रियाच्या ठिकाणी खाज सुटणे , पायाला गोळे येणे , करटे उठणे अशी लक्षणे काहींना जाणवतात. मध्यमवयीन पुरुषांमध्ये संभोग...