SUCCESS STORY (तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे येणाऱ्या वंध्यत्वासाठी 'आयुर्वेद' एक खात्रीशीर पर्याय)
साधारण एक वर्षापूर्वी एक विवाहित जोडपे उपचारासाठी दवाखान्यामध्ये आले होते. ओळखीतील असल्यामुळे थोड्याशा गप्पा झाल्यावर एकाने अडखळात-अडखळत वंध्यत्वासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का , असे विचारले. डॉक्टरांच्या मते स्री व पुरुष दोघांमध्ये कुठलाही दोष नाही , स्री व पुरुष बीजाची संख्या , रचना अगदी व्यवस्थित व आवश्यक तेवढी आहे , गर्भाशयासंबंधी कुठलाही आजार नाही , पाळीदेखील नियमित व स्वस्थ आहे , गर्भ राहण्यास कुठलाही अडथळा नाही , असे सांगण्यात आले होते. परंतु गर्भ काही केल्या राहत नव्हता. हे सांगत असताना दोघांच्या मनातील व्यथा लक्षात येत होती. रुग्ण ग्रामीण भागातील असल्यामुळे आधुनिक उपचाराचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नव्हता. विविध रिपोर्ट्सची मोठी फाईल त्यांनी माझ्या समोर ठेवली. रुग्णाने सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट तर सामान्य दिसत होता. या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी रुग्णाचा इतिहास जाणून घेण्याचे ठरवले. यामध्ये भूक उत्तम , झोप उत्तम , पोट व्यवस्थित साफ होत असे , पाळी व्यवस्थित व नियमित कुठल्याही त्रा...