Posts

Showing posts from December 11, 2018

वाढणारे पोट आणि आरोग्य

Image
शर्टच्या बाहेर डोकवणारे पोट आज काल सामान्य गोष्ट आहे. सुट्लेले पोट म्हणजे सम्रुध्दीच लक्षण असा समज झालेला दिसतो. जेवणानंतर किंवा इतर वेळी   पोटावरुन रुबाबात हात फ़िरवणारे लोक आपणास चोहीकडे दिसतात. त्यामुळे पोट व सुटलेले पोट यातील फ़रक समजणे सर्व सामण्यासाठी आवगढ झाले आहे. परंतु सुट्लेल्या पोटाचा आरोग्याच्या द्रुष्टीने काही महत्त्व आहे का ? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ? याचा आपण कधी विचार करतो का ? तर नाही. शर्टमध्ये बंधिस्थ असणारे पोट अचानक बाहेर कसे डोकाऊ लागते ? याचा आपण कधी विचार करत नाही. शरीराची जसी वाढ होते , त्याचप्रमाणे पोटाचीही वाढ होते असा काहीसा समज आहे. मुळात पोट हाच दुर्लक्षीत विषय आहे. आधुनिक शास्रानुसार पचनाला काहीहि महत्व नसल्यामुळे सामन्य जणास पोट आणि पचन याविषयी विषेश रस नसतो. अपचनामुळे सर्व आजार होतात आसा आयुर्वेदाचा सिध्दांत सांगतो. परंतु पचनाचे काय होईल त्याचे त्यासाठी ओषदांची काही गरज नाही , असे सांगणारा एक डोक्टरांचा वर्ग आहे. त्यामुळे पचनाच्या विक्रुती तशाच राहतात व ह्ळुह्ळु सर्व शरीर आजाराचे माहेरघर बनत जाते. पोट सुटण्याची का