Posts

Showing posts from December 5, 2019

निद्रानाश - मधुमेहास आमत्रंण

Image
निरोगी आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तास झोप अत्यावश्यक असते. परंतु , बदलत्या जीवनशैलीमुळे , कामाच्या स्वरुपामुळे , स्पर्धेमुळे शरीराला पुरेशी झोप मिळणे दुरापास्त होत चालले आहे . त्यात टेलीव्हिजन , इंटरनेट आणि इतर मनोरंजनाची साधने अजुनच भर घालत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की, मधुमेह आणि निद्राविकाराचा संबंध काय ? खरंतर, निद्राविकारामुळे मधुमेह होण्याची शक्यता बळावते आणि मधुमेहामुळे निद्रेवर परिणाम होतो. अमेरिकन डायबीटीस असोसिएशनच्या अहावालानुसार, ५ तासापेक्षा कमी झोप घेणा-या व्यक्तींना डायबीटीस होण्याचा धोका जास्त असतो. नविन संशोधनानुसार निद्रानाशाचा त्रास असणा-या ४० वर्षाखालील व्यक्तीला टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. २८ , ००० व्यक्तींवर करण्यात आलेल्य संशोधनानुसार हा निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कमी झोप - मधुमेहाचे मुख्य कारण रात्री उशिरा झोपणं , रात्रपाळी करणं किंवा इतर काही कारणांमुळे पुरेशी झोप होत नसेल , तर भविष्यात मधुमेह होण्याचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावांमुळे इन्शुलिनचे कार्य बिघडते आणि अशा लोकांना मधुमेह होण्याचा मोठा धोक