Posts

पाठीच्या मनक्याचे आजारव आयुर्वेदिय उपचार

  पाठीच्या मनक्याचे आजारव आयुर्वेदिय उपचार   आधुनिक जीवनशैली अंगीकारल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर याचे अनेक व गंभीर दुष्परीणाम दिसत आहे. पाठीच्या मनक्याचे आजार हे त्यापैकीच एक उदाहरण.मानदुखी , पाठ दुखी , कंबर दुखी या सर्वसाधारण वाटाणा-या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यामध्ये येत असतात. याची कारण मीमांसा केली असता यामागे अनेक कारणे दिसुन येतात , जसे Cervical - lumbar spondylitis, Cord Compression, Disc Bulge, Osteoporosis, Sciatica, Gout, सांधेवातइत्यादी . हीसर्व कारणे पाठीचा मनका , त्यातील गादी , त्याभोवती असणारे स्नायु , नसा यांच्याशी संबधीत आहेत. पाठीच्या मनक्याची रचना मोठी गजब आहे. छोटे-छोटे मनके एकमेकांवर स्नायुच्या साहाय्याने जोडलेले असतात , त्यामध्येआघात शोषण्यासाठी (Shock Absorption) गादी असते ,   मेंदुकडुन येणा-या नसायातुन बाहेर पडतात. याप्रमाणे एकमेंकावर अवलंबुन घट्ट अशी रचना तयार झालेली असते. या रचनेमध्ये थोडासा जरी बिघाड झाला तरी मान-पाठ-कंबरदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो.   कंबरेत दुखणे , पायांना मुंग्या येणे , सकाळी उठताना त्रास होणे , चालताना त्रास  होणे किंवा चाल

रक्ती मुळाव्यधासाठी सोपे उपाय #Tips_for_Bleeding_piles (#20)

Image
#ayurveda #yoga #ayurvedalifestyle #health #ayurvedic #healthylifestyle #ayurvedalife #wellness #ayurvedaeveryday #ayurvedicmedicine #natural #india #meditation #healthyfood #vegan #organic #fitness #ayurvedafood #skincare #healthy #beauty #nature #ayurvedatreatment #vata #medicine #kapha #herbal #pitta #holistichealth #selfcare

पित्त विकारांसाठी आहार विहार नियोजन #07

Image
नमस्कार पित्ताचा आजार जसे अम्लपित्त, आग होणे, घाम येणे, तोंड येणे, डोळे हातापायाची जळजळ होणे या आजारामध्ये कशा पद्धतीचा आहार विहार असावा. काय खाऊ नये?, काय खावे?, काय करू नये?, काय करावे?, कसे वागावे? या विषयी सखोल माहिती असणे आवश्यक आहे. या व्हिडीओ मध्ये आपण पित्ताच्या आजारासाठी कशा प्रकारे आहार विहाराचे नियोजन करावे या विषयी सखोल माहिती आहे. तरी पित्ताचे आजार व आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तीने याचा अवश्य लाभ घ्यावा. आम्लपित्त आणि पित्ताच्या आजारा संबंधी आयुर्वेदीय उपचार व पंचकर्म उचारासाठी अवश्य संपर्क करा धन्यवाद डॉ सचिन गायकवाड पाटील M.D. आयुर्वेद . श्री विश्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र मंजिरी निवास हॉटेल लालाजी समोर नागेश्वरवाडी निराळा बाजार औरंगाबाद 8237523722 / 9420270785

वसंत ऋतु आणि वमन पंचकर्म

Image
  शिशीर ऋतुमधील थंडी कमी होऊन वातावरणात गरमी वाढायला सुरुवात झाली की वसंत ऋतु सुरु झाला असे समजावे. शिशीर ऋतुमध्ये थंडीमध्ये शरीरात साचलेला कफ वसंतातील सुर्याच्या उष्णतेने वितळतो. यामुळे या ऋतुमध्ये कफदोष व कफदोषामुळे होणारे सर्दी( Allergy),  खोकला ,  श्वसनाचे विकार ,   दमा( Asthma)  सर्दीताप हे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. वसंत ऋतुमध्ये कफाचे आजार असणा-या व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी. वसंतात वाढलेला कफदोष वेळेत कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी आयुर्वेदिय औषधी , पंचकर्म , पथ्य व ऋतुचर्याचे पालन करणे उपयुक्त ठरू शकते. वमन पंचकर्म आयुर्वेदानुसार वसंत ऋतुमध्ये वाढलेला कफदोष तोंडावाटे शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे वमन पंचकर्म. आयुर्वेद सिध्दांतानुसार वाढलेला कफदोष जवळच्या मार्गाने बाहेर काढल्यामुळे कफदोषाचे आजार मुळापासुन बरे होण्यास मदत मिळते. वमन पंचकर्मामध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार व आजारानुसार विशिष्ट औषधीतुप तीन त पाच दिवस योग्य मात्रेत दिले जाते. सर्वांगाला मालिश शेक केला जातो. सातव्या दिवसी सकाळी उलटीचे औषध देऊन डॉक्टरांच्या निगराणीखाली वमन पंचकर्म करण्यात येते. सर्व प

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद

Image
  अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद                दिवाळी जरी चार दिवसांपुरती असली तरी अभ्यंगस्नानाचे महत्व हे आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यभराचे आसते. आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून किमान एकदा तरी अभ्यंगस्नान करायलाच हवे. आयुर्वेद शास्रानुसार आणि भारतीय परंपरेनुसार अंगाला तेल लावून जिरवणे आणि उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ करणे याला अभ्यंगस्नान" असे म्हटले जाते.                आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वात प्रथम अभ्यंगाला सुरुवात कधी होते माहिती आहे का ? जेव्हा हॉस्पिटल मधून छोटसं बाळ घरी येतं आणि आजी तेलाने मालिश करून छान गरम पाण्याची अंघोळ घालते आणि धुरी देते ना, इथेच बाळाला खर आयुर्वेदाची ओळख होते Baby soft skin हा शब्दच सगळं सांगून जातो. पण आयुर्वेदात अभ्यंग फक्त या दिवाळीच्या 5 दिवसात नव्हे तर रोज करायला सांगितले आहे. म्हणजे , " अभ्यंग " चा समवेश " दिनचर्या " या भागात वर्णन केला आहे . रोज सकाळी उठल्यावर तैलाने अभ्यंग करावा. अभ्यंगाने होणारे फ़ायदे अतिशय महत्त्वाचे आहे. अभ्यंग चा अर्थ काय ? संपूर्ण शरीराला तेल लावणे. ते ही स्वत:चे हाताने. यामध्ये फक्त संपूर्ण

कोरोना काळात उपयुक्त ५ गोष्टी (# 05)

Image

कोविड १९ संकटाच्या वेळी आयुष मंत्रलायभारत सरकार (Ministry of AYUSH, Gov. Of India)यांनीप्रतिकारशक्ती वाढवणे व स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहे.

  कोविड १९ संकटाच्या वेळी आयुष मंत्रलायभारत सरकार ( Ministry of AYUSH, Gov. Of India ) यांनीप्रतिकारशक्ती वाढवणे व स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहे.   कोविड १९ च्या उद्रेकानंतर , जगातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे. शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली (रोग प्रतिकारशक्ती) उत्तम आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रतिबंद हे उपचार करण्यापेक्षा चांगला असतो. आत्तापर्यंत कोविड -१९ वर कोणतेही औषध नसले तरी या काळात आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देणारे प्रतिबंधक उपाय करणे चांगले होईल. आयुर्वेद , जीवन विज्ञान आहे , निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या देणग्यांचा वापर करतो. आयुर्वेद प्रतिबंधात्मक काळजी वर व्यापक ज्ञानाचा आधार आहे , " दिनचर्या" रोजचा दिनक्रम आणि "ॠतुचर्या" या संकल्पनेतून निरोगी आयुष्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो.   स्वतःबद्दल जागरूकराहुन आणि प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्तीची वाढऊन आणि टिकवून ठेवू शकतो. यावर आयुर्वेद शास्त्रत जोर देण्यात आला आहे. आयुष मंत्रालय श्वसन आरोग्याच्