शीतपित्त /Urticaria
#urticaria#Urticaria# शीतपित्त #Ayurvedicmedicineforurticaria #Ayurvedictreatmentforurticaria #Ayurveda #Ayurvedamedicine #Ayurvedatreatment #drsachingaikwad #drsachinpatil #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad शीतपित्त / Urticaria पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. सुरवंट अंगावरून फिरल्यावर जश्या गाठी उठतात तश्याच या गाठी असतात. खाज सुद्धा भरपूर असते. काही जणांनातर फक्त पाण्याशी किंवा थंड हवेशी संपर्क आला कि जेवढ्या उघड्या अंगाचा, हाताचा, पायाचा संपर्क आला असेल तेवढ्याच भागावर या गाठी उठतात. एक रुग्ण तर माझ्याकडे असे आहेत कि ज्यांना सकाळी थंड पाण्याच्या नळाखाली हात धुतले कि लगेच या गाठी उठायला सुरवात होतात. काही जणांना तर या कश्याने उठतात हेच समजत नाही. फार त्रास होत नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात तर काहींना या गाठी उठल्या कि काहीच सुचत नाही. दुसरे कुठलेच काम करता येत नाही. खाज एवढी असते कि सर्व कामे बाजूला ठेऊन फक्त काही न काही यावर लावत बसावे लागते. मग काही ...