शीतपित्त /Urticaria

#urticaria#Urticaria#शीतपित्त #Ayurvedicmedicineforurticaria #Ayurvedictreatmentforurticaria #Ayurveda #Ayurvedamedicine #Ayurvedatreatment #drsachingaikwad #drsachinpatil #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad

शीतपित्त /Urticaria


   
             पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. सुरवंट अंगावरून फिरल्यावर जश्या गाठी उठतात तश्याच या गाठी असतात. खाज सुद्धा भरपूर असते. काही जणांनातर फक्त पाण्याशी किंवा थंड हवेशी संपर्क आला कि जेवढ्या उघड्या अंगाचा, हाताचा, पायाचा संपर्क आला असेल तेवढ्याच भागावर या गाठी उठतात. एक रुग्ण तर माझ्याकडे असे आहेत कि ज्यांना सकाळी थंड पाण्याच्या नळाखाली हात धुतले कि लगेच या गाठी उठायला सुरवात होतात. काही जणांना तर या कश्याने उठतात हेच समजत नाही. फार त्रास होत नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात तर काहींना या गाठी उठल्या कि काहीच सुचत नाही. दुसरे कुठलेच काम करता येत नाही. खाज एवढी असते कि सर्व कामे बाजूला ठेऊन फक्त काही न काही यावर लावत बसावे लागते. मग काही काळाने या गाठी कमी होतात. यातील बहुतांशी लोकअंगावर गाठी उठून खाज सुरु झाली कि एक सेट्रीझिन नावाची गोळी घेतात. याने खाज थांबते पण झोप जास्त लागते. दिवसभर गुंगी आल्यासारखे वाटते. आणि तात्पुरते बरे वाटते. परत गाठी आल्या कि परत हि गोळी. याचे दीर्घकालीन दुष्परिणाम हि अधिक आहेत पण दुसरा कुठला पर्यायाच माहित नसल्याने अथवा उपलब्ध नसल्याने डॉक्टर व रुग्ण सुद्धा आजकाल याच गोळीची मदत घेत आहेत. मात्र याच्या अधिक सेवनामुळे शरीरातील सर्व स्राव अचानक शोषल्यासारखे होतात. तोंड, घसा कोरडा पडतो. झोप जास्त लागते क्वचित उतारवयामध्ये विस्मरणाचा धोका वाढतो. म्हणून या आजारावर अश्या गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करण्याऐवजी याला मुळापासून बरे केले पाहिजे. हा कश्यामुळे होतो हे समजून घेतले पाहिजे.

का होते?

        आधुनिक शास्त्रात याचे “Urticaria” असे नामकरण केले आहे. तर आयुर्वेदात याचे “ शीतपित्त ” असे फार सुरेख वर्णन केले आहे. कित्तेक लोक हा आजार कोणत्यातरी गोष्टीची Allergy असल्याने आला असेल म्हणून सर्व टेस्ट करून घेतात.

        पण गम्मत म्हणजे आयुर्वेदानुसार यात शीत गुणाने वाढलेला वात स्वकारणाने बिघडलेल्या पित्ताला कोठ्यातून शाखेत खेचून आणतो व सर्वांगावर गाठी उत्पन्न करतो असे वर्णन आहे. याचे खाज येणे, न येणे, गाठेची कडा जाड असणे, मधेच खड्डा पडणे असे अनेक छोटे छोटे प्रकार पडतात. या प्रत्येक प्रकारात अन्य दोषांचा समावेश असतो. त्यामुळे चिकित्सेचे तत्व सुद्धा बदलते. म्हणून सर्वात प्रथम आपण योग्य वैद्याकडे जाऊन आपले निदान करून याचे उपचार सुरु करावेत. म्हणजे या त्रासपासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल.

आजारा चे कारण

       थंड पदार्थांचे सेवन, थंड वारा, थंड पाण्याचा संपर्क यामुळे हा आजार उद्भवतो तर त्याच बरोबर काही जणांना गवार, शेवगा, वांगी, फरसाण, हरभरा डाळीचे पदार्थ खाण्यात आले कि याचा उद्भव जाणवतो. क्वचित मांसाहार अथवा उष्ण व मसालेदार, तिखट भाज्या खाण्यात आल्या तरी याचा त्रास जाणवतो.

घरगुति उपचार

       यासाठी आज्जीबाईच्या बटव्यातील काही उपचार तत्काळ लागू पडतात, याने लगेच बरे वाटते. यामध्ये कांद्याचा रस सर्वांगाला लावणे, कोथिंबिरीचा रस व खिसलेले ओल्या नारळाचे खोबरे एकत्र करून लावणे,खोबरेल तेल कोमट करून सर्वांगाला लावणे याने लगेच बरे वाटते. पण लक्षात ठेवा हे फक्त आयुर्वेदिकतात्पुरते उपचार आहेत.

    कायमस्वरूपी हा आजार बरा करण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार व वमन, विरेचन, बस्ती व रक्तमोक्षण इत्यादी पंचकर्म शास्त्रोक्त पद्धतीने करून घेणे गरजेचे आहे.

     हा आजार दिसायला साधा दिसत असला तरी काही लोकांना मात्र याने फार हैराण केले आहे. अगदी त्यांचे आनंदी जीवनच हिरावून घेतले आहे. आणि तात्पुरत्या उपचारांना बळी पडून त्यांना भविष्यकालीन मोठमोठ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. आपण यांना वेळीच योग्य उपचारांची माहिती देऊन या त्रासातून त्यांची सुटका करून देऊ शकतो. गरज आहे ती फक्त आयुर्वेदात हजारो वर्ष्यांपूर्वी या आजारावर सांगितलेल्या उपचारांची माहिती करून घेण्याची. एखाद्या प्रगत गणल्याजाणाऱ्या शास्त्रात यावर काही उपाय नाही म्हणजे अन्य शास्त्रात सुद्धा यावर उपचार नाही असे होत नाही. शास्त्र बदललेकि त्याची आजाराकडे पाहण्याची दृष्टी बदलते. म्हणून एकदा तरी असल्या आजरावर अयुर्वेदिय चिकित्सा करून घ्यावि.

Dr. Sachin Gaikwad-Patil
MD (Ayurveda)  
8237523722 
 8275183419 

Pune:- 
@ Chandrama Ayurveda 
A-5 Shruti Appt. Near Hotel Magnolia 
Baner Road Baner Pune 

Aurangabad:-
@ Shree Vishawankur Ayurveda Center
Near HDFC bank, Nirala Bazar,

Aurangabad.         

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद