उन्हाळ्यातील आजार व आयुर्वेदिय उपचार
उन्हाळ्यातील आजार व आयुर्वेदिय उपचार जानेवारी-फेब्रुवारीतील गारवा हा हा म्हणता सरला आणि गेल्या आठवडय़ापासून हवा चांगलीच गरम होऊ लागली. हा काळ हिवाळ्यातून उन्हाळ्याचे स्थित्यंतर होण्याचा काळ आहे. अजूनही हिवाळ्याप्रमाणे वारे पूर्व , ईशान्येकडून वाहत आहेत. मात्र आता गारठय़ाऐवजी ते गरम हवा घेऊन येऊ लागले आहेत. मार्चमध्ये सरासरी तापमान ३७ अंश से. असते. तर गेल्या दहा वर्षांत मार्चमध्ये तापमानाने ४० अंश से.चा पल्लाही पार केला आहे. या काळात सूर्यकिरणे थेट काटकोनात येत असल्याने त्यांची तीव्रता अधिक असते. राज्याच्या अंतर्गत भागातील तापमान ४५ अंशांच्याही पलीकडे जाते व तेथे उष्माघाताने मृत्यूच्याही घटना घडतात. एप्रिल मध्ये वाढलेल्या तापमाणामुळे उन्हाळा कसा असेल हे , सर्वांच्या लक्षात आलेच आसेल. वातवरणामध्ये होणा-या बदलामुळे प्रत्येक वर्षी तापमाणामध्ये वाढ होत आहे. मराठवाडा , विदर्भ , खांदेश या भागामध्ये तर तापमाणातील फ़रक विशेषत्वाने जाणवतो. या वाढलेल्या तापमाणाचा ज्याप्रमाणे वातावरणावर परिणाम दिसतो , त्याचप्रमाणे आरोग्यावरही अतिशय , दुरगामी दुष्परीणाम दिसुन येतो . उन्हाळ्यामध्ये उष्णत...