उन्हाळ्यातील आजार व आयुर्वेदिय उपचार
उन्हाळ्यातील आजार व
आयुर्वेदिय उपचार
जानेवारी-फेब्रुवारीतील गारवा हा हा म्हणता सरला आणि
गेल्या आठवडय़ापासून हवा चांगलीच गरम होऊ लागली. हा काळ हिवाळ्यातून उन्हाळ्याचे
स्थित्यंतर होण्याचा काळ आहे. अजूनही हिवाळ्याप्रमाणे वारे पूर्व, ईशान्येकडून वाहत आहेत.
मात्र आता गारठय़ाऐवजी ते गरम हवा घेऊन येऊ लागले आहेत. मार्चमध्ये सरासरी तापमान
३७ अंश से. असते. तर गेल्या दहा वर्षांत मार्चमध्ये तापमानाने ४० अंश से.चा
पल्लाही पार केला आहे. या काळात सूर्यकिरणे थेट काटकोनात येत असल्याने त्यांची
तीव्रता अधिक असते. राज्याच्या अंतर्गत भागातील तापमान ४५ अंशांच्याही पलीकडे जाते
व तेथे उष्माघाताने मृत्यूच्याही घटना घडतात.
एप्रिल मध्ये वाढलेल्या
तापमाणामुळे उन्हाळा कसा असेल हे, सर्वांच्या लक्षात आलेच आसेल. वातवरणामध्ये होणा-या बदलामुळे प्रत्येक
वर्षी तापमाणामध्ये वाढ होत आहे. मराठवाडा, विदर्भ, खांदेश या भागामध्ये तर तापमाणातील फ़रक विशेषत्वाने जाणवतो. या वाढलेल्या
तापमाणाचा ज्याप्रमाणे वातावरणावर परिणाम दिसतो, त्याचप्रमाणे
आरोग्यावरही अतिशय, दुरगामी दुष्परीणाम दिसुन येतो.
उन्हाळ्यामध्ये
उष्णतेमुळे शरीरातील पित्त दोष वाढुन पित्तादोषामुळे होणारे आजार डोके वर काढु
लागतात.
प्रामुख्याने मुळव्याध, रक्ती मुळव्याध, सोरायसिस, त्वाचाचे आजार, आम्लपित्त,
जास्त घाम येणे, निद्रानाश, अस्वस्थता, मानसिक ताण-तणाव, पोटाच्या
आजारामध्ये वाढ दिसुन येते.
त्याचप्रमाणे रक्तातील
उष्णता वाढल्यामुळे उष्णतेचे आजार, गोवर, कांजण्या, काविळ,
Herpes zoster, पक्षाघात, Brain Stroke उष्माघात
(Sun Stroke) इत्यादिचे देखील प्रमाण वाढतात.
वातावरामध्ये वाढलेल्या
उष्णतेमुळे शरीरातील पित्त दोष वाढुन आजारास कारनीभुत ठरतो. उन्हाळ्यामध्ये वाढणारी
उष्णता कमी करण्यासाठी, तसेच
वरील आजाराचे प्रतिबंध व उपचार साठी आयुर्वेदिय ओषधोपचार, पंचकर्म,
आहार-विहार व पथ्य पालनांचा चांगला उपयोग होत असुन, आयुर्वेदिय ओषधोपचार वैद्यकिय सल्ल्याने घेतल्यास अधिक फ़ायदा होऊ शकतो.
आहारामध्ये खालील गोष्टी टाळणे
चहा, कोफ़ी, तंबाखु,
दारु, सीगारेट, मीरची,
ठेचा, दही, मका, नाचणी, जव, ढोबळी मिरची,
गरम मसाला, कारले, मेथी,
शेवगा, तुरीची दाळ, मटार,
चवळी,छोले, हरभरा,
वाल, कडधान्य, लसुण,
हिंग, मोहरी, ओवा,
तीळ, लाल मिरची, चिंच, अननस, कच्चा टोमेटो व इतर आंबट फ़ळे
आहारामध्ये खालील गोष्टी वापरणे
दुध, तुप, लोणी, मनुका, खारीक, पाण्यात
भीजवलेले बदाम, द्राक्षे, कलिंगड,
खरबुज, लिंबाचे सरबत, गुलकंद,
मोरावळा, दुर्व्याचा रस, नारळाचे पाणी, नारळाची मलइ, नारळाची
बर्फ़ी, कोहळ्याचा पेठा, कैरीचे पन्हे,
कोकम शरबत, तांदळाची खीर, गव्हाची खीर, थंड पाणी, सर्व
प्रकारचे फ़ळांचे रस, ज्यस
इत्यादी.
उन्हाळ्यात कसे वागावे:-
·
घराबाहेर पडतानी पातळ, सुती, पांढ-या व
फ़िक्या रंगाचे कपडे घालावे
·
बाहेर जाताना छत्री, टोपी, चष्मा, गाडीवर
हेल्मेट वापरावे
·
घरात पंखा, ए.सी. कुलर वापरावे.
·
घामाघुम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा
व्यायाम करावा
·
शक्यतो गार पाण्याने स्नान करावे.
·
रात्र लहान असल्यामुळे दुपारी अर्धा-पाऊण तास
झोप आवश्य घ्यावी
·
सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे व सायंकाळी
हिरवीगार झाडी असलेल्या बगीचात फ़िरायला आवश्य जावे.
·
रात्री मोकळ्या हवेत झोपावे
·
रात्री जागरण करु नये
·
प्रक्रुतीस उपयुक्त आसे टोनीक आवश्या घ्यावे.
वरील प्रमाणे आहाराचे नियोजन केल्यास
उन्हाळ्याचा त्रास कमी होइल. उन्हाळ्यामध्ये उदभवणा-या आजारांसाठी आयुर्वेदिय
उपचार केल्यास सर्व त्रास मुळापासुन कमी होऊ शकतात. आयुर्वेदिय उपचारासाठी आवश्य संपर्क
साधावा
आमवात
|
संधिवात
|
पाठीच्या
मणक्याचे आजार
|
रक्तदाब
|
मधुमेह
|
स्थुलपणा
|
वजन
वाढण्यासाठी
|
स्री
व पूरुष वंध्यत्व
|
स्रीयांच्या
मासिक पाळीचे आजार
|
PCOD / PCOS
|
दम्यासाठी
|
मुळव्याधासाठी
|
मुतखड्यासाठी
|
किडनीचे
आजार
|
त्वचारोगांसाठी, सोरीयासीस
|
केसांच्या
सर्व तक्रारीसाठी
|
उंची
वाढवण्यासाठी
|
बुध्दी, स्मृती
एकाग्रता वाढविण्यासाठी,
|
फ़िटससाठी
|
व्यसनमुक्ती
साठी
|
वार्ध्यक्य
निवारण
|
श्री विश्वांकूर आयुर्वेद व पंचकर्म केन्द्र
Dr.
Sachin Gaikwad – Patil MD (Ayurveda),Pune
|
श्री
विश्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र HDFC बंकेजवळ, निराला बाजार, औरंगाबाद.
8275183419 / 8237523722
|
श्री
चद्रंमा आयुर्वेद व पंचकर्म केंद्र सोमेश्वर चौक,बानेर,पुणे.
|
Comments
Post a Comment