Posts

Showing posts from February 25, 2020

वसतं ऋतुतील पंचकर्म “वमन कर्म”

Image
शिशीर ऋतुमधील थंडी कमी होऊन वातावरणात गरमी वाढायला सुरुवात झाली की वसंत ऋतु सुरु झाला असे समजावे. शिशीर ऋतुमध्ये थंडीमध्ये शरीरात साचलेला कफ वसंतातील सुर्याच्या उष्णतेने वितळतो. यामुळे या ऋतुमध्ये कफदोष व कफदोषामुळे होणारे सर्दी( Allergy),  खोकला , श्वसनाचे विकार ,  दमा( Asthma)  सर्दीताप हे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. वसंत ऋतुमध्ये कफाचे आजार असणा-या व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी. वसंतात वाढलेला कफदोष वेळेत कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी आयुर्वेदिय औषधी , पंचकर्म , पथ्य व ऋतुचर्याचे पालन करणे उपयुक्त ठरू शकते. वमन पंचकर्म आयुर्वेदानुसार वसंत ऋतुमध्ये वाढलेला कफदोष तोंडावाटे शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे वमन पंचकर्म. आयुर्वेद सिध्दांतानुसार वाढलेला कफदोष जवळच्या मार्गाने बाहेर काढल्यामुळे कफदोषाचे आजार मुळापासुन बरे होण्यास मदत मिळते. वमन पंचकर्मामध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार व आजारानुसार विशिष्ट औषधीतुप तीन त पाच दिवस योग्य मात्रेत दिले जाते. सर्वांगाला मालिश शेक केला जातो. सातव्या दिवसी सकाळी उलटीचे औषध देऊन डॉक्टरांच्या निगराणीखाली वमन प...