वसतं ऋतुतील पंचकर्म “वमन कर्म”
शिशीर ऋतुमधील थंडी कमी होऊन वातावरणात गरमी वाढायला सुरुवात झाली की वसंत ऋतु सुरु झाला असे समजावे. शिशीर ऋतुमध्ये थंडीमध्ये शरीरात साचलेला कफ वसंतातील सुर्याच्या उष्णतेने वितळतो. यामुळे या ऋतुमध्ये कफदोष व कफदोषामुळे होणारे सर्दी(Allergy), खोकला, श्वसनाचे विकार, दमा(Asthma) सर्दीताप हे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात.
वसंत ऋतुमध्ये कफाचे आजार असणा-या व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी. वसंतात वाढलेला कफदोष वेळेत कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी आयुर्वेदिय औषधी,पंचकर्म,पथ्य व ऋतुचर्याचे पालन करणे उपयुक्त ठरू शकते.
वमन पंचकर्म
आयुर्वेदानुसार वसंत ऋतुमध्ये वाढलेला कफदोष तोंडावाटे शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे वमन पंचकर्म. आयुर्वेद सिध्दांतानुसार वाढलेला कफदोष जवळच्या मार्गाने बाहेर काढल्यामुळे कफदोषाचे आजार मुळापासुन बरे होण्यास मदत मिळते. वमन पंचकर्मामध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार व आजारानुसार विशिष्ट औषधीतुप तीन त पाच दिवस योग्य मात्रेत दिले जाते. सर्वांगाला मालिश शेक केला जातो. सातव्या दिवसी सकाळी उलटीचे औषध देऊन डॉक्टरांच्या निगराणीखाली वमन पंचकर्म करण्यात येते. सर्व प्रक्रिया ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे, अन्यथा त्रास होऊ शकतो. यानंतर तीन ते पाच दिवस आहारात पथ्ये पाळावी लागतात.
वमन कर्मामुळे उरः कंठ, फुफ्फुस, आमाशय(पोट), नाक, डोके, रस धातु, मेद धातु या सर्वांची शुध्दी होऊन या ठिकाणी साचलेला अशुध्द कफदोष शरीराबाहेर पडतो.
वमन पंचकर्मामध्ये आपल्या पोटातील, फुफ्फुस, छाती, व नाकातील सायनस मधील बारीक रचनेमध्ये साचलेला, रुक्ष झालेला, चिकटलेला, कुजलेला, कफ स्निग्ध करून मालिश-शेक करून मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्यात येतो. यामुळे छाती हलकी होते, फुफ्फुसाची स्वच्छता होते, नाकातील सायनस मोकळे होतात, सायनसचा त्रास, डोकेदुखी, डोके जड पडणे, सतत सर्दी होणे, ॲलर्जी होणे कमी होते.
वमन पंचकर्म कशासाठी करावे?
१) वसंत ऋतुत वाढलेला कफदोष कमी करण्यासाठी
२) सतत होणारी ॲलर्जी, सर्दी कमी करण्यासाठी
३) ऋतु बदलल्यावर होणारा सर्दी, खोकला, तापेचा त्रास कमी करण्यासाठी
४) सायनस व त्यामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी
५) दमा (अस्थमा), श्वासाचा त्रास कमी करण्यासाठी
६) सतत होणारे अपचन, अजीर्ण, आम्लपित्त, जीर्ण आम्लपित्त कमी करण्यासाठी
७) त्वचारोग, सोरियासिस, पांढरे कोड कमी करण्यासाठी
८) स्थुलपणा कमी करण्यासाठी
९) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
आपण जर वरील आजारांनी त्रस्त असाल तर आजच क डॉक्टरांचा सल्ला घेऊन वमन पंचकर्म करुन घ्यावे.
श्री विश्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्रामध्ये वसंत ऋतुतील वमन पंचकर्म शिबीर सुरू आहे, तरी आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
प्रथम नोंदणी करणा-या १० रुग्णांना वमन पंचकर्मावर १०-१५ टक्क्यांची विशेष सूट. लाभ घेण्यासाठी आजच नोंदणी करा.
Comments
Post a Comment