अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद

 अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद



            दिवाळी जरी चार दिवसांपुरती असली तरी अभ्यंगस्नानाचे महत्व हे आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यभराचे आसते. आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून किमान एकदा तरी अभ्यंगस्नान करायलाच हवे. आयुर्वेद शास्रानुसार आणि भारतीय परंपरेनुसार अंगाला तेल लावून जिरवणे आणि उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ करणे याला अभ्यंगस्नान" असे म्हटले जाते.

            आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वात प्रथम अभ्यंगाला सुरुवात कधी होते माहिती आहे का ? जेव्हा हॉस्पिटल मधून छोटसं बाळ घरी येतं आणि आजी तेलाने मालिश करून छान गरम पाण्याची अंघोळ घालते आणि धुरी देते ना, इथेच बाळाला खर आयुर्वेदाची ओळख होते Baby soft skin हा शब्दच सगळं सांगून जातो. पण आयुर्वेदात अभ्यंग फक्त या दिवाळीच्या 5 दिवसात नव्हे तर रोज करायला सांगितले आहे. म्हणजे , " अभ्यंग " चा समवेश " दिनचर्या " या भागात वर्णन केला आहे . रोज सकाळी उठल्यावर तैलाने अभ्यंग करावा. अभ्यंगाने होणारे फ़ायदे अतिशय महत्त्वाचे आहे.

अभ्यंग चा अर्थ काय ?
संपूर्ण शरीराला तेल लावणे. ते ही स्वत:चे हाताने. यामध्ये फक्त संपूर्ण त्वचेवर औषधी तेल लावुन ते जिरवणे अपेक्षित असते.

“अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वात हा II”
अभ्यंग नित्य करावे. कश्यासाठी ?

  1. जरा:- शरीराला येणारे म्हातारपण कमी करणे. कमी वयात येणारे म्हणजे अकाली व वयानुसार येनारे म्हातारपण कमी करण्यासाठी उपयोगी.
  2. श्रम:- शारीरीक काम केल्याने येणारा थकवा दुर करणे.
  3. वातहा:- शरीरीत वाढलेला वात नियंत्रणात आणने.
  4. दृष्टिप्रसाद :- दृष्टी स्वच्छ ठेवते, म्हणजे डोळ्यांची कार्यक्षमता वाढवते.
  5. पुष्टी: शरीराचे पोषण करणे
  6. आयु:- आयुष्य वाढवणे
  7. स्वन्प:- झोप येण्यास मदत करते व मानसिक-शरीरीक थकवा कमी करते.
  8. सुत्वक:- त्वचा सुकुमार ठेवते व त्वचेची कांती वाढवते.
  9. दार्ढ्यकृत: शरीर दृढ, पिळदार व मजबुत बनवते.

            मुळातच शरीरातील वाताचे संतुलन रहावे, ( balance ), कंबर दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी इत्यादी आजार मागे लागू नयेत, याची सोय आयुर्वेद शास्त्राने " नित्य अभ्यंग " यामध्ये करुन ठेवली आहे. फार नाही, पण निदान आंघोळी आधी 10 मिनीट संपूर्ण अंगाला तेल लावणे व त्यानंतर कोष्ण पाणी अंगावरुन घेणे, हे सर्वांना करता येणे शक्य आहे.
आणि अगदी रोज जमत नसेल, तर त्याची सोय पण ग्रंथात मांडली आहे.

“शिर: श्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेतII”
किमान डोक्याला तेल लावणे, कानाला चोळणे व तळ पायांना तेल चोळने हे तरी नित्य करावे. हे तेल कोमट वापरावे.

वयानुसार अभ्यंगाचा विचार करता लहानपणा हा काफ़ाचा, तरुणपणा पित्ताचा आणि म्हातारपणा वाताचा असतो. लहानपणी बाळाचे वाढते वय आणि मांसपेशींचे पोषण होण्यासाठी लाक्षा तेल, बला तेल, बला अश्वगंधा तेल, चंदनबला लाक्षादी तेल याचा वापर करावा. तरुणपणी कामाच्या ताणतणावामुळे शरीराला, मांसपेशींना येणारा थकवा दुर करण्यासाठी धान्वंतर तेल, सहचर तेल, दशमुळ तेल, यांचा वापर करावा. म्हातारपणामध्ये वयानुसार कमी होणारी शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी बला तेल, बिल्वादी तेल, नारायण तेल, महानारायण तेल यांचा वापर करावा.

सुगंधी उटणे
दिवाळी म्हटलं की आठवणारा दुसरा भाग म्हणजे " उटणे " याला म्हटले आहे " उद्वर्तन "
विशिष्ठ सुगंधी वनस्पतींचे चूर्ण संपूर्ण अंगाला चोळने. ते सुध्हा रोज करायला सांगितले आहे.

फायदे काय याचे?
“ उद्वर्तनम कफहरम मेदस: प्रविलापनम II”

त्वचेच्या खाली वाढणारा जास्तीचा मेद व शरीरात वाढणारा कफ आटोक्यात ठेवण्याचे काम रोज अंगाला उटणे लावल्याने होते. म्हणजे , रोज केलेले उद्वर्तन वजन प्रमाणात ठेवण्यासही मदत करते.यामध्ये वापरलेल्या वनस्पती चूर्ण मुळे त्वचा मऊ होते. स्वेद ग्रंथींची स्वच्छता होते. Scrub या संकल्पनेचा गाभा " उद्वर्तन " मध्ये मिळतो.

चला तर मग, सुरु करुया तयारी दिवाळी अभ्यंग स्नानाची आणि त्याचा समावेश आपल्या नित्य दिनक्रमात करायची

धन्यवाद


Comments

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार