Success Story (त्वचा रोगांवर 'आयुर्वेद' एक खात्रीशीर पर्याय)
त्वचा रोगांवर 'आयुर्वेद' एक खात्रीशीर पर्याय त्वचा रोगावरील उपचारासाठी एक रुग्ण (केस.नं.५०३) दोन महिन्यापूर्वी क्लिनिकमध्ये आला होता. त्याच्या चेहऱ्यावर, छातीवर, हातावर, सर्वांगावर छोटे-छोटे चट्टे स्पष्टपणे दिसत होते. अनेक ठिकाणी उपचार घेऊन कंटाळलो असल्याचे रुग्णाचे म्हणने होते. Eczema किंवा Fungal infection असे निदान त्याला सांगण्यात आले होते. औषधी घेतल्यास थोड्या प्रमाणात हे चट्टे कमी होतात व औषध बंद झाल्यास पुन्हा परिस्थिती पुर्ववत होत असे. असे चक्र बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे , असे रुग्णाचे म्हणने होते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही त्याला दिसत नव्हता. आजार बरा होत नसल्याने रुग्ण मानसिक ताण-तणावाखाली असल्याचे जाणवत होते. यामुळे आजार अधिक प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनात येत होते. तीच ती औषधी पुन्हा-पुन्हा घेऊन रुग्ण अतिशय वैतागलेला दिसत होता. घेतलेल्या औषधांचा शरीरावर काय दुष्परिणाम होईल याविषयीची चिंतादेखील त्याने बोलून दाखवली. संबंधित रोगाविषयी रूग्णाची संपूर्ण माहिती घेतल्यावर काही गोष्टी जाणवल्या. त्या याप्रमाणे, १. खाण्यामध...