Success Story (त्वचा रोगांवर 'आयुर्वेद' एक खात्रीशीर पर्याय)


त्वचा रोगांवर 'आयुर्वेद' एक खात्रीशीर पर्याय

त्वचा रोगावरील उपचारासाठी एक रुग्ण (केस.नं.५०३) दोन महिन्यापूर्वी क्लिनिकमध्ये आला होता. त्याच्या चेहऱ्यावर, छातीवर, हातावर, सर्वांगावर छोटे-छोटे चट्टे स्पष्टपणे दिसत होते. अनेक ठिकाणी उपचार घेऊन कंटाळलो असल्याचे रुग्णाचे म्हणने होते. Eczema किंवा Fungal infection असे निदान त्याला सांगण्यात आले होते. औषधी घेतल्यास थोड्या प्रमाणात हे चट्टे कमी होतात व औषध बंद झाल्यास पुन्हा परिस्थिती पुर्ववत होत असे.  असे चक्र बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे , असे रुग्णाचे म्हणने होते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही त्याला दिसत नव्हता. आजार बरा होत नसल्याने रुग्ण मानसिक ताण-तणावाखाली असल्याचे जाणवत होते. यामुळे आजार  अधिक प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनात येत होते. तीच ती औषधी पुन्हा-पुन्हा घेऊन रुग्ण अतिशय वैतागलेला दिसत होता. घेतलेल्या औषधांचा शरीरावर काय दुष्परिणाम होईल याविषयीची चिंतादेखील त्याने बोलून दाखवली. 


संबंधित रोगाविषयी रूग्णाची संपूर्ण माहिती घेतल्यावर काही गोष्टी जाणवल्या. त्या याप्रमाणे, 
१. खाण्यामध्ये आंबट पदार्थांचे अतिसेवन (जसे, ठेचा-लोणचे-लिंबु-दही-अन्य आंबट पदार्थांची विषेश आवड),
२. मैदायुक्त पदार्थाचे अतिसेवन, 
३. रात्री उशीरापर्यंत जागरण, 
४. आम्लपित्त, अपचन, पोटात वायू धरणे, पोट साफ न होणे इत्यादी त्रास कमी-अधिक प्रमाणात होत असल्याचे रुग्णाने स्पष्ट केले .

यावरुन असे लक्षात आले, की रुग्ण पित्त दोष वाढवणारा, रक्तधातु दुषित करणारा व आहार-विहार नियमितपणे न घेणारा असल्यामुळेच हा आजार शरीरात घर करून बसला आहे. हे त्याच्या निदर्शनास आणून देऊन, वरील गोष्टी आधी बंद करण्यास सुचवल्या. रुग्णानेदेखील त्यासाठी तयारी दाखवली. 

रुग्णाला उपचाराची दिशा समजून सांगितली, जसे आम्लपित्त कमी करणे,पचन सुधारणे, रक्त दोष कमी करणे, पित्त दोष कमी करणे, त्वचा सुधारण्यासाठी औषधोपचार व पंचकर्म करणे आवश्यक असल्याचे सुचवले. या रुपरेषेप्रमाणे रुग्णाला औषधी उपचारांची सुरवात करून आठ दिवसांनी पुन्हा तपासणीसाठी बोलावले. 

आठ दिवसांनी तो रुग्ण आल्यावर चेहऱ्यावरील डाग कशाप्रकारे कमी झाले आहेत हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता.

तपासणीसाठी आल्यावर रुग्ण अतिशय खूश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता. आतापर्यंत कुठल्याही औषधांनी असा फरक जाणवला नाही, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. पुढील उपचार व पंचकर्मासह आजार काही दिवसांत पूर्णपणे कमी होईल याची रुग्णाला स्वत:लाच खात्री पटली, हे मात्र विशेष. 

रुग्णानुसार आयुर्वेदिय पंचकर्म उपचार केल्यास त्वचारोग सहजपणे कमी होऊ शकतात. त्वचाविकारात वात, पित्त, कफामुळे दुषित झालेले रक्तधातु विशेषत: कारणीभूत असतो. त्यासाठी आयुर्वेदातील रक्तशुध्दी करणारी औषधी, पंचकर्म, वमन, विरेचन, रक्तमोक्षण, जलोकावचारण अतिशय अप्रतिम व गुणकारी सिध्द होतात. हे अनेक रुग्णांच्या अनुभवावरुन आपण सांगू शकतो.

सोरीयासीस सारख्या त्वचारोगामध्ये मानसिक आरोग्याचाही संबंध मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यामध्ये वरील औषधोपचार पंचकर्मासहीत मानसिक आरोग्याच्या दृष्टीने देखील उपचार करणे गरजेचे असते. यासाठी शिरोधारा, नस्य, अभ्यंग या पंचकर्मांचा उत्तम उपयोग होतो. 


आयुर्वेद हा त्वचाविकारासाठी अप्रतिम व गुणकारी असा पर्याय सिध्द होत आहे. श्री विश्वाकुंर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र येथे त्वचारोगासाठी विशेष संशोधित औषधी व पंचकर्मांचा रूग्णांना निश्चितच लाभ होऊ शकतो. 


आपणदेखील त्वचारोगासाठी आयुर्वेद औषधी व पंचकर्माचा अवश्य लाभ घ्यावा. 
यासाठी श्री विश्वाकुंर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र येथे अवश्य भेट द्यावी.

धन्यवाद
डॉ. सचिन गायकवाडएम.डी., (आयुर्वेद)
संपर्क:- 8237523722 / 8275183419
श्री विश्वाकुंर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
औरंगाबाद
व पुणे

Comments

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद