अम्लपित्त कारणे आणि उपचार
अम्लपित्त कारणे आणि उपचार आहार या स्वरुपात घेतलेल्या अन्नाचे शारीरिक घटकात रूपांतर होण्यासाठी पोटात पचनाची गरज असते. पोटामध्ये असणाऱ्या पित्ताच्या मदतीने हे पचन होत असते, त्यामुळे पचनाची घटना पित्ताच्या स्वरुपावर अवलंबून असते. या पित्ताला अम्लता आली तर त्याची पचवण्याची शक्ति कमी होते या आजारला अम्लपित्त म्हणतात. विकृत पित्तामुळे आहारापासून तयार होणारा आहार रस निट तयार होत नाही. त्या रसा मध्ये पित्ताचे अधिक्ये असते. त्यामुळे सर्व शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते. सर्व शरीरा मध्ये पित्ताची उष्णात्ता जाणवते, त्यामुळे सर्व शरीर घटकावर वाढीव पित्ताचा परिमाण होतो त्यामुळे अनेक पचन संबंधी आजार होतात. अम्लपित्त या आजारात पित्ताला आलेल्या आंबट पणामुळे आहारातील प्रत्...