अम्लपित्त कारणे आणि उपचार


अम्लपित्त कारणे आणि उपचार 


                 आहार या स्वरुपात घेतलेल्या अन्नाचे शारीरिक घटकात रूपांतर होण्यासाठी पोटात पचनाची गरज असते.  पोटामध्ये असणाऱ्या पित्ताच्या मदतीने हे पचन  होत असते, त्यामुळे पचनाची घटना पित्ताच्या स्वरुपावर अवलंबून असते.  या पित्ताला अम्लता आली  तर  त्याची  पचवण्याची शक्ति कमी  होते या आजारला अम्लपित्त म्हणतात.


                विकृत पित्तामुळे आहारापासून  तयार होणारा आहार रस निट तयार  होत नाही. त्या रसा मध्ये पित्ताचे अधिक्ये असते.  त्यामुळे सर्व शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते.  सर्व शरीरा मध्ये पित्ताची उष्णात्ता जाणवते, त्यामुळे सर्व शरीर घटकावर वाढीव पित्ताचा परिमाण होतो त्यामुळे अनेक पचन संबंधी आजार होतात.

              अम्लपित्त या आजारात पित्ताला आलेल्या आंबट पणामुळे आहारातील प्रत्येक गोष्टी पासून
आंबट पणा च तयार होतो.  त्यातल्यात्यात आंबट, तिखट , खारट पदार्थ खाण्यात असतील तर त्यात अजूनच भर पडते आणि पित्त जास्त तिव्रतेने वाढते.  

 अम्लपित्त कारणे

१) जेवणामध्ये असणारी अनियमितता (वेळेनुसार  जेवण न घेणे )
२) जास्त प्रमाणात  जेवणे 
३) भुक नसताना जेवणे 
४) भुक लागली असताना चहा, कॉफ्फी पिणे 
५) अतिशय उशीरा जेवणे 
६) आंबट, तिखट , खारट पदार्थ जास्त प्रमाणात घाण्यात असणे 
७) वरचेवर अजीर्ण असताना उपचार न करणे 
८) जागरण करणे किंवा रात्री उशीरा झोपून सकाळी उशीरा उठणे 
९) गरम मसाला युक्त पदार्थ नेहमी खाण्यात असणे 
१०) तंबाखू , गुटखा, मद्यपान, सिगारेट ई व्यसन 
११) मानसिक ताण, तणाव, चिंता 
१२) सारका होणारा चिडचिडेपणा 
१३) कामाचा असणारा अतिरिक्त ताण 
१४) दिवसा झोपणे, दिवस जेवणा नंतर लगेच  झोपणे
१५) चहा, कॉफ्फी अति घेणे 
१६) अतिप्रमाणात  पाणी घेणे


उपचार

औषधी 
             अम्लपित्त  हा छोटासा  आजार वाटतो, परंतु त्यामुळे होणारे परिणाम अतिशय वाईट आहेत. हा आजार हळू हळू आपले परिणाम शरीरावर दाखवतो व ते अतिशय दुर्गामी असतात. कारण हा आजार रोजच्या पचनाशी संबंधित आहे. त्यामुळे याचे परिणाम रोजच्या पाचानाबरोबर शरीरात जातात. त्यामुळे अम्लपित्त चे विशेष काळजी पूर्वक उपचार करावेत.

            औषधी या स्वरुपात सुतशेकर रस , भुमिन्बदि काढा, शतावरी , गुळवेल, सारिवा, या प्रकारची
औषधी  उपयुक्त आहेत. 
वरील औषधी  वैदेकीय सल्ल्यानेच घ्यावीत. 



अ) पथ्येकर  आहार व विहार  ( उपयुक्त आहार )


१ ) तिखट, आंबट, खारट  पदार्थ टाळावे
२ ) spicy food, fast food  टाळावे
३) बेकरीचे पदार्थ टाळावे
४)  तेलकट , तुपकट पदार्थ टाळावे
५) दही , शेगदाने, लोणचे टाळावे
६) चाहा,  कॉफ्फी  कॉफ्फ टाळावे  किंवा कमी प्रमाणात घेणे
७) गरम मसाला युक्त पदार्थ टाळावे 
८)  तंबाखू , गुटखा, मद्यपान, सिगारेट ई व्यसन टाळावे


९ ) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात
१०) दिवसा झोपणे  टाळावे, जागरण करू नये
११) मानसिक ताण, तणाव, चिंता कमी करण्यासाठी प्राणायाम , योगा ई. गोष्ठी कराव्यात



आपल्या प्रकृति नुसार आहार आणि विहार असावा. तो आयुर्वेदीय वैद्या कडून समजून घ्यावा
















Comments

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद