तुमच्या मधुमेहामागे ‘स्ट्रेस’ हे तर कारण नाही ना?
गेल्या काही
वर्षांत सर्वत्र ज्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यापैकी एक
म्हणजे ‘मधुमेह’ अर्थात ‘डायबेटीस’ .
रक्तातील
साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे
शरीराला आवश्यक असणा-या ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ
असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली
साखर शरीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत
एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या
प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि
मधुमेह होतो.
सामान्य लक्षणे :
मधुमेह झालेला असताना सुरुवातीच्या अवस्थेत
लघवीला जास्त वेळा जावे लागते. रात्रीच्या वेळी लघवीला उठावे लागते, तहान जास्त लागते,
वजन कमी वाटू लागते, अशक्तपणा व निरुत्साह वाटतो, जननेंद्रियाच्या ठिकाणी खाज सुटणे, पायाला गोळे
येणे, करटे उठणे अशी लक्षणे काहींना जाणवतात. मध्यमवयीन पुरुषांमध्ये संभोग इच्छा कमी
होणे व काही प्रमाणात लैंगिक कमजोरी जाणवते. अर्थात प्रत्येक वेळी वरील लक्षणे
जाणवतील असेही नाही. काही वेळा कोणत्याही तक्रारीशिवाय ‘मधुमेह’ असू शकतो.
मधुमेहाची
कारणे
स्थूलता, मानसिक ताण-तणाव
(स्ट्रेस), अनुवंशिकता, इन्सुलिन निर्मितीत
अडचण, प्रतिकार
शक्ती मधील विकृती या कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो.
संशोधनानुसार सतत मानसिक ताण-तणावाखाली
असणा-या लोकांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. डायबेटिस असलेल्यांपैकी ९५ टक्के रुग्णांना ‘डायबेटिस टाइप २’ ने ग्रासलेले
असते.
नेदरलँडमधील
युनिव्हर्सिटी ऑफ अमस्टरडॅममध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार,
स्ट्रेसमुळे होणारे जीवनशैलीतील बदल, हार्मोन्समधील बदल, खालवलेली
प्रतिकारशक्ती या गोष्टी मधुमेह निर्मीतीस मोठ्या प्रमाणावर कारणीभुत ठरत आहेत.
मानसिक
ताण-तणावामुळे मधुमेही व्यक्ती तब्येतीची व्यवस्थित काळजी घेत नाही. बाहेरील खाणे, व्यायाम
न करणे, आहार-विहार व्यवस्थित नसणे अशा
प्रकारची चुकीची जीवनशैली आंगिकारतो व त्यामुळे मधुमेह अधिक वाढण्याची शक्यता
असते.
मधुमेहाचे
परिणाम :
जेव्हा आपण
मोठ्या प्रमाणावर मानसिक ताण-तणावाचा सामना करतो, त्यावेळी आपल्या शरीरातील स्ट्रेस
हार्मोन्स (अॅड्रेनलीन
आणि कोरटीसोल) रक्तामध्ये सोडले जातात. त्यामुळे
श्वासाचा वेग वाढतो, शरीरातील मोठ्या मांस पेशींना व हातापायाच्या
पेशींना जास्त प्रमाणात रक्त पुरवठा केला जातो. यामुळे शरीर आपत्कालीन परिस्थितीसाठी
तयार होते. ही प्रक्रिया शरीरात घडते, यास फाइट किंवा फ्लाइट रिसपॉन्स असे म्हणतात. रक्तातील
या हार्मोन्स बदलामुळे रक्तशर्करा ऊर्जेत रुपांतरीत होऊ शकत नाही, रक्तात
तशीच पडून राहते. ही क्रिया सतत घडत राहिल्यास शरीरातील रक्तशर्करा ऊर्जेत रुपांतर
करण्याच्या प्रक्रियेमध्ये कायमस्वरुपी बिघाड होऊन मधुमेह होण्याची शक्यता वाढते
किंवा असलेला मधुमेह अधिक गंभीर परिणाम दाखवू शकतो.
आयुर्वेद मतानुसार मानसिक ताण-तणावामुळे मनावरदेखील परिणाम जाणवतो. त्यामुळे मनातील रजोदोष अथवा रजोगुण (सत्व, रजो, तमो)
वाढतो. वाढलेला रजोदोष शरीरातील वात, पित्त व कफ यापैकी एक किंवा दोन दोषामध्ये
बिगाड निर्माण करतो. मनुष्याची प्रकृती, आहार-विहार,
दिनचर्या, जीवनशैली
यामुळे बिघडलेल्या दोषांबरोबर रजोदोष संयोग होऊन शरीरामध्ये मधुमेह सारख्या
आजारांची निर्मित होऊ शकते. या वाढलेल्या
मानसिक ताण-तणावाचा पचनसंस्था, हार्मोन्स,
हृदय, रक्ताभिसरण
संस्था, मज्जासंस्था यावरही विपरित परिणाम जाणवतो.
मधुमेहासाठी
आयुर्वेदिय औषधी व पंचकर्म :
मधुमेह व मानसिक
ताण-तणावासाठी आयुर्वेदिय औषधी व पंचकर्म उपचार अतिशय प्रभावी ठरू शकतात. यासाठी
रुग्णाच्या आजार, अवस्था,
प्रकृती व वाढलेल्या दोषानुसार
आयुर्वेदिय औषधी व पंचकर्माचा उपयोग करावा. यात मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी
ब्राम्ही, शंखपुष्पी,
जटामांसी इत्यादी औषधी व शिरोधारा, शिरोबस्ती, नस्य, मालीश-शेक, बस्ति
इत्यादी पंचकर्माचा आजाराच्या स्वरुपानुसार लाभ होऊ शकतो.
मधुमेहामध्ये
शरीरातील साखर वाढण्यास कारणीभुत ठरलेल्या दोषांवर नियत्रंण मिळवणे आवश्यक ठरते, त्यासाठी
विविध औषधांचा उपयोग करणे गरजेचे असते. मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय
औषधी कधीही घेऊ नये. त्याचप्रमाणे आहाराचे नियोजन, पथ्य-अपथ्य, योग्य
प्रमाणात व्यायाम, व आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारल्यस मधुमेहावर
आपण सहज मात करू शकतो.
मधुमेह व मानसिक
ताण-तणावाशी संबंधित आयुर्वेदिय उपचारांसाठी अवश्य संपर्क साधावा. Reference:-
डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.),आयुर्वेद -पुणे
श्री विश्वांकूर आयुर्वेद
पूणे - औरंगाबाद
संपर्क:- 8237523722
8275183419
Comments
Post a Comment