पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार
आधुनिक
जीवनशैली अंगीकारल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर याचे अनेक व गंभीर दुष्परीणाम
दिसत आहे. पाठीच्या मनक्याचे आजार हे त्यापैकीच एक उदाहरण. मानदुखी, पाठ दुखी, कंबर दुखी या सर्वसाधारण वाटाणा-या
तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यामध्ये येत असतात. याची कारण मीमांसा केली असता
यामागे अनेक कारणे दिसुन येतात, जसे Cervical - lumbar spondylitis, Cord Compression,
Disc Bulge, Osteoporosis, Sciatica, Gout, सांधेवात इत्यादी. ही सर्व कारणे पाठीचा मनका, त्यातील गादी, त्याभोवती असणारे स्नायु, नसा यांच्याशी संबधीत आहेत.
पाठीच्या
मनक्याची रचना मोठी गजब आहे. छोटे-छोटे मनके एकमेकांवर स्नायुच्या साहाय्याने
जोडलेले असतात, त्यामध्ये आघात शोषण्यासाठी (Shock
Absorption)
गादी असते, मेंदुकडुन येणा-या नसा यातुन बाहेर पडतात. याप्रमाणे
एकमेंकावर अवलंबुन घट्ट अशी रचना तयार झालेली असते. या रचनेमध्ये थोडासा जरी बिघाड
झाला तरी मान-पाठ-कंबरदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो.
कंबरेत दुखणे, पायांना मुंग्या येणे, सकाळी उठताना त्रास
होणे, चालताना त्रास
होणे किंवा चालता न येणे, पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे, मांडी घालून खूप वेळ
बसू न शकणे, शौचाला बसता न येणे, चक्कर येणे, हात बधीर होणे, खांद्यापासून
हाताच्या बोटापर्यंत मुंग्या येणे अशी लक्षणे या आजाराची सांगता येतील.
कारणांचा विचार
करता खालील गोष्टी लक्षात येतात.
१) खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकालवरून प्रवास
करणे.
२) पोटाच्या
संबधीत तक्रारी, मलावरोध, मुळव्याध, वाताचा त्रास असणे.
३) वयामाना नुसार हाडांची झीज होणे, मनक्यातील गादीचा आकार बदलने.
४) वजन
वाढल्यामुळे पाठीच्या मणक्यावर अधिक भार पडणे.
५) अपघातामुळे मणक्याला इजा होणे,
६)
सतत बैठे काम केल्यामुळे पाठीच्या मनक्यात येणारी विक्रुती
७)
डिलेव्हरीच्या वेळेला नसावर दाब पडणे.
८) मासिक पाळी
व्यवस्थीत साफ़ होत नसल्यामुळे.
९) स्त्रियांमध्ये पाली
बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठीसुळपणा.
१०)
गर्भशयाची पिशवी काढल्यानंतर होणारी हाडांची झीज.
११) स्रीयांन मध्ये रजोनिव्रुतीनंतर हाडांना येणारा
ठीसुळ्पणा, होणारी झीज.
१२) जेवणात वात दोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे, उदा: वांगे, बटाटे, हरबरा डाळ, वाटणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ ई.
शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे
आजार उदभवतात.
सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी
खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक
औषधिनी तात्पुरते बरे वाटते. परंतु वेदनाशामक औषधी मणक्याच्या आजाराची परिपूर्ण उपचार नाही. वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन लावणे व ऑपरेशन
करणे हा क्रम ठरलेलेच असतो. परंतु वेळेत लक्ष देऊन आयुर्वेदिय पंचकर्म व
ओषधोपचार घेतल्यास आराम मिळवणे सहज शक्य होऊ शकते. अन्यथा वेळेप्रमाणे हा आजार अधिक गंभीर
होण्याची शक्यता असते.
आयुर्वेदिय
उपचार पध्दती ही आजाराला मुळापसुन बरी करणारी उपचार पध्दती आहे. यामध्ये
आयुर्वेदिय पंचकर्म म्हणजे शरीरशुध्दी प्रक्रीयेचा आंतरभाव आहे. यामध्ये शरीरातील
आजाराला कारणीभुत असणारे दोष (वात, पित्त, कफ़) हे मोठ्या प्रमाणावर शरीराच्या
बाहेर काढले जातात. यामुळे आजाराचे बळ, वेदना
झपाट्याने कमी येतात.
पाठ-मान-कंबर
दुखी हा हाडांशी व पर्यायाने वाताशी सबंधीत आजार आहे, यासाठी वात दोष कमी करणारी बस्ति
पंचकर्म, वेदनाशामक कटीबस्ती, रक्तमोक्षण, जलोका, आग्निकर्म, स्नेहन-स्वेदन यांचा प्रभावी उपयोग होतो.
त्याचप्रमाणे इतर आयुर्वेदिय ओषधाने या आजारावर प्रभावी व गुणकारी उपचार होऊ
शकतात.
यासाठी
आजाराच्या सुरुवातीच्या आवस्थेत आयुर्वेदिय उपचार व शरीर शुध्दी पंचकर्म केल्यास
आजार लवकर आटोक्यात येऊ शकतो.
डॉ. सचिन गायकवाड, एम.डी., (आयुर्वेद) यांचे श्री विश्वाकुंर आयुर्वेद व पंचकर्म
केंद्र हे
पाठीच्या मनक्याच्या आजारासाठी विशेष आयुर्वेदिय उपचार पध्दतीचा उपयोग करतात. या
उपचारांचा रुग्णाना अतिशय फ़ायदा जाणवतो. पाठ-मान-कंबर दुखी या रुग्णासाठी हे आयुर्वेदिय उपचार ही एक सुवर्णसंधी आहे, तरी रुग्णानी याचा लाभ घ्यावा व गरजु
रुग्णांपर्यंत हा मेसेज पोहचवा. ही विनंती.
आपण ही याचा
फ़ायदा घेण्यासाठी एकदा आवश्य भेट द्या. (सर्व रीपोर्ट घेऊन येणे)
डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.),आयुर्वेद -पुणे
श्री विश्वांकूर आयुर्वेद
पूणे - औरंगाबाद
संपर्क:- 8237523722
8275183419
Comments
Post a Comment