Posts

Showing posts from 2018

वाढणारे पोट आणि आरोग्य

Image
शर्टच्या बाहेर डोकवणारे पोट आज काल सामान्य गोष्ट आहे. सुट्लेले पोट म्हणजे सम्रुध्दीच लक्षण असा समज झालेला दिसतो. जेवणानंतर किंवा इतर वेळी   पोटावरुन रुबाबात हात फ़िरवणारे लोक आपणास चोहीकडे दिसतात. त्यामुळे पोट व सुटलेले पोट यातील फ़रक समजणे सर्व सामण्यासाठी आवगढ झाले आहे. परंतु सुट्लेल्या पोटाचा आरोग्याच्या द्रुष्टीने काही महत्त्व आहे का ? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो ? याचा आपण कधी विचार करतो का ? तर नाही. शर्टमध्ये बंधिस्थ असणारे पोट अचानक बाहेर कसे डोकाऊ लागते ? याचा आपण कधी विचार करत नाही. शरीराची जसी वाढ होते , त्याचप्रमाणे पोटाचीही वाढ होते असा काहीसा समज आहे. मुळात पोट हाच दुर्लक्षीत विषय आहे. आधुनिक शास्रानुसार पचनाला काहीहि महत्व नसल्यामुळे सामन्य जणास पोट आणि पचन याविषयी विषेश रस नसतो. अपचनामुळे सर्व आजार होतात आसा आयुर्वेदाचा सिध्दांत सांगतो. परंतु पचनाचे काय होईल त्याचे त्यासाठी ओषदांची काही गरज नाही , असे सांगणारा एक डोक्टरांचा वर्ग आहे. त्यामुळे पचनाच्या विक्रुती तशाच राहतात व ह्ळुह्ळु सर्व शरीर आजाराचे माहेरघर बनत जाते. पोट सुटण्याची का

रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद

Image
रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद                                         २१ व्या शतकात सर्व आरोग्यविषयक सोयी सुविधा असूनही आपल्या आरोग्याचे हाल होताना दिसत आहे. लोकांची प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने अशा आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. असे ऎकल्यावर एक प्रश्न डोळ्यासमोर आला की, साधारणतः १००-२०० वर्षांपूर्वी राहण्या-खाण्याची, आरोग्याची व्यवस्था नसणारे लोक असे सारखे-सारेखे आजारी पडत असतील का? तसे होत नसल्याचे लक्षात आले. कारण की त्या काळी लोकांची प्रतिकार शक्ती चांगली असल्याचे ऎकायला मिळाले. १००-२०० वर्षांपूर्वीचे राहणीमान आज स्वीकारणे तर शक्य नाही, मग प्रतिकार शक्ती वाढवणार-या काही उपचार पध्दती आरोग्य क्षेत्रात उपलब्ध आहे का? याचा मागोवा घेण्याचे ठरविले.         आज आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक उपचार पध्दती आहेत. जसे की, आधुनिक उपचार, होमिओपॅथी उपचार, नॅचरोपथी उपचार, आयुर्वेदिय उपचार, नवीन येऊ घातलेली चायनिज उपचार पध्दती. यापैकी कुठली उपचार पध्दती आपल्याला प्रतिकार शक्ति व आरोग्य या दोन्हीसाठी उपयोगी पडू शकते? असा प्रश्न साहजिकच सामान्य माणसाच्या मनात येऊ

निद्रा (झोप) SLEEP

Image
 #sleep #insomnia #treatmentforsleep #Ayurveda #Ayurvedatreatmentforsleep #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad #Cicardiancycle #Ayurvedapanchakarama #depression # निद्रा #झोप निद्रा (झोप)          जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) झोप ही निरोगी आयुष्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. आज जगभरात अनेक लोक झोप न येण्याच्या त्रासा पासुन त्रस्थ आहेत. रात्री योग्य वेळी पुरेषी झोप न झाल्यास शरीराचे नैसर्गिक चक्र (Cicardian Cycle) भिघडुन आनेक आजारांना आमंत्रण मिळते. या सर्व आजारांना आळा घालण्यासाठी झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे.            निद्रा शरीरधारणेस मदत करते व अरोग्याचे रक्षण करुन आरोग्यसंपन्नतेला हातभार लावते. दररोज सर्वसामान्यपणे सुर्योदयापुर्वी एक ते दीड तास आधी, सुमारे सात तासांची झोप पुर्ण होईल, अशा अंदाजाने प्रत्येक व्यक्तीने रात्री शरीरे व मनास टप्प्याटय्याने संपुर्ण  शांत करुन, स्वतःला निद्रेच्या स्वाधीन करावे.           जेव्हा मन व इन्द्रियेही थकतात, त्यावेळी स्रोतसे कफ़ाने आवृत होतात आणि इन्द्रिय त्यांच्या विषयापासुन निवृत होऊन, मनुष्य निद्रेच्या अधीन होतो.