वाढणारे पोट आणि आरोग्य
शर्टच्या
बाहेर डोकवणारे पोट आज काल सामान्य गोष्ट आहे. सुट्लेले पोट म्हणजे सम्रुध्दीच
लक्षण असा समज झालेला दिसतो. जेवणानंतर किंवा इतर वेळी पोटावरुन रुबाबात हात फ़िरवणारे लोक आपणास
चोहीकडे दिसतात. त्यामुळे पोट व सुटलेले पोट यातील फ़रक समजणे सर्व सामण्यासाठी
आवगढ झाले आहे. परंतु सुट्लेल्या पोटाचा आरोग्याच्या द्रुष्टीने काही महत्त्व आहे
का? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? याचा आपण कधी विचार करतो का? तर नाही.
पोट सुटण्याची
कारणे:-
स्रीयांच्या बाबतीत वरील कारणाबरोबर पाळीच्या तक्रारी, दिवसा झोपणे, डिलेव्हरीच्या वेळी वाढणारे वजन याकाही
वैशिष्टपुर्ण गोष्टी.
सुटलेल्या पोटाचा
अरोग्यावर होणारा परिणाम:-
1) पचनाचे महत्वाचे कार्य पोटाच्या ठिकाणी
होत असते. पोटाचा त्रास म्हणजे पचनाची विक्रुती असे समीकरणच आहे. सतत
होणा-या अपचनातुन असिडिटी (Acidity) तयार होते. हा आजार जीर्ण(Chronic
Acidity)
झाल्यावर त्याचा परिणाम ह्र्द्य(Heart Disease), ब्लड प्रेशर(Blood
Pressure), कोलेस्र्टोल(Cholesterol), किडणी (Chronic
kidney Disease)
यावर दिसुन येतो. तसेच या अपचणातुन पोटाचा अकार वाढण्यास सुरुवात होते.
2) Central Obesity / वाढलेले पोट ह्र्यदरोग (Heart
Disease) व
प्रमेह (Type 2 Diabetes) यांचाशी फ़ार जवळचा संबंध आहे. त्याच
प्रमाणे Polycystic Ovary Syndrome (PCOS),
Glucose intolerance, Dyslipidaemia, Dementia, Alzheimer’s Disease, Asthma,
Insomnia (अनिद्रा) या आजारांचाही वाढलेल्या पोटाशी संबधीत
आहे. असे अनेक संशोधनातुन समोर आले आहे.
1 3) वाढलेल्या पोटवर मेद साचतो, त्यामुळे वजन वाढुन मनुष्य मेदोरोग
(स्थुलपणा) कडे झुकतो. सेंट्रल ओबेसिटि म्हणजे पोटाचा आकार वाढुन येणारा
स्थुलपणा आहे. त्यामुळे पोट वाढलेले लोक स्थुलपणाच्या उंबरठ्यावर आहे, हे लक्षात घ्यावे.
2 4) वाढलेल्या पोटामुळे शरिरास जडपणा येतो, शरिराच्या हालचाली मंद होतात, उत्साह कमी होणे, दम लागणे, घोरणे यासारखे त्रास सुरु होतात.
4) पोटावर असणा-या पेशींचे स्नायु मागे
पाठीच्या मनक्याला जोडलेले असतात, पोटाचा
आकार वाढल्यामुळे या स्नायुवर ताण पडुन, स्नायु
ताणले जातात. त्यांचा ओढा पाठीच्या मनक्यावर येऊन, मनक्यामध्ये विकृती येऊ शकते. यामुळे पाठ दुखी, मान दुखी, कंबर दुखी Lumbar Spondylitis,
Cervical spondylitis, Sleep Disc, Disc Compression, Nerve Compression, Sciatica यासारख्या आजारांची सुरुवात होते.
5) पोट वाढळ्यामुळे वजनात वाढ होते. या
वाढलेल्या वजणाचा गुड्घ्यावर अतिरिक्त ताण येतो व गुडघेदुखीच्या त्रासाची सुरुवात
होते. सांध्यामध्ये
विक्रुती येऊन सांधे निकामी होऊ शकतात.
6) अपचणामुळे / असिडीटी मुळे मलावष्टभ्य (Constipation) होते. त्यामुळे वाढलेले गसेस वेळोवेळी
दुर्गंधासह पास होतात. यामुळे पोटाची शिथिलता वाढते. तर दुसरीकडे वाढलेल्या
वातामुळे हाडांची झीज व सांध्याचा त्रास सुरु होतो.
8) काही व्यक्तीनां झोपे संबंधीत तक्रारी
सुरु होतात, स्वभाव चिडका बनतो, कुढल्याही गोष्टीमध्ये मन रमत नाही, सारखे अस्वस्थ वाटते.
9) स्रीयांमध्ये पोटावरील चरबी वाढने, याचा संबंध पाळीच्या तक्रारी व
डिलेव्हरीशी जास्त प्रमाणात असतो. तसेच दिवसा झोपण्याची सवय यात अजुन भर घालते.
10) अनियमित मासिक पाळी, योग्यवेळी, योग्य प्रमाणात साफ़ होत नसल्यास
पोटावरील व कंबरेवरील मेद वाढण्याची शक्यता असते. Central
Obesity असणा-या
स्रीयांना पी.सी.ओ.डी. (P.C.O.D.) चा त्रास होणे, गर्भाशयाच्या नळ्यांवर दाब येऊन
व्यंधत्व येण्याची शक्यता असते.
11) डिलेव्हरीमध्ये अलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी शरीर
मेद स्वरुपात स्निग्धपणा वाढवते, त्यामुळे
पोट व कंबरेच्या भागात मेद साचुन वजन वाढण्यास सुरुवात होते.
तसेच केस गळणे, हाडे ठिसुळ होणे, झोप न येणे, मानसिक ताण-तणाव जानवणे. अशा अनेक
समस्या निर्माण होतात.
12) गर्भिणीवस्थेमध्ये विशिष्ट पध्दतीने
खाणे-पीणे-वागणे व डिलेव्हरी नंतर मालिश शेक शेगडी अशा प्रकारची दिनचर्या असायला
हावी. त्यामुळे शरीराचा कोरडेपणा कमी होऊन वजन नियत्रित राहाण्यास मदत होते असते.
परंतु अधुनिकतेच्या नावाखाली अशा गोष्टी टाळल्या जात असल्यामुळे डिलेव्हरी नंतर
वजन वाढणे हे सर्वसामान्य होऊन बसले आहे.
आयुर्वेदाच्या
शारीरिक मापदंडा प्रमाणे छातीचा भाग हा पोटाच्या भागापेक्षा मोठा असावा, रुंद असावा व पोट आत असावे. हे पोटातील
पचन उत्तम असल्याचे लक्षण आहे. तसेच छाती रुंद असल्यामुळे जास्त प्रमाणात प्राण वायु
शरीरात जातो व श्वासाची गती कमी असते. त्यामुळे शरीर निरोगी व दिर्घायुषी राहत. या
गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. त्यामुळे पोटावरुन हात फ़िरवण्यापेक्षा पोटाचा
आकार कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वरील गोष्टी वाचुन सुटलेले पोट म्हणजे काय आजार आहे का? असे तुम्हाला वाटेल. तसे नाही सुटलेले
पोट म्हणजे आजार नाही तर आजाराची सुरवात असु शकते. पोट हे पचनाशी संबंधीत अवयव
आहे. पचनाची विक्रुती पोटाच्या आकाराला व पर्यायाने शरीरिक विक्रुतीला/ आजाराला
कारणीभुत ठरु शकते. त्यामुळे योग्य वेळी सुटलेल्या पोटाची दखल घेणे गरजेचे आहे.
आयुर्वेदाच्या
साहाय्याने योग्य ते निदान, ओषधोपचार, पंचकर्म, पथ्य, जीवनशैली बदल करुण यावर उपचार करणे
आवश्यक आहे. यासाठी आयुर्वेदिय उपचारांची दिशा खालील प्रमाणे आहे.
साधारण पथ्य:-
1)
सतत आहार घेणे टाळावे. भुक लागल्यावर माफ़क प्रमाणातच खावे. भुक नसताणी खाणे
टाळावे. थोडक्यात खाण्याविषयी शिस्त पाळावी.
2)
साधारणतः दिवसातुन फ़क्त २ वेळा जेवण व गरज असल्यास १ वेळा नाष्टा करावा.
3) जेवणानी
अन्न व्यवस्थित चाऊन खावे,
खुप भर-भर किवां खुप वेळ जेवत बसु नये.
4) जेवणानंतर
गोड पदार्थ, थंड पदार्थ, जड पदार्थ, आइस क्रिम (Ice
Cream) मिठाई
टाळावी.
5) जेवनाध्ये शितपेय, मिस्क जुस, फ़ळे शक्योतो टाळावे.
6) चहाचे
प्रमाण कमी असावे.
7)
फ़ास्ट फ़ूड, Spicy food, Hotteling ईत्यादी गोष्टी टाळावे.
8)
दिवसा झोपणे, जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे.
9)
जेवणामध्ये जास्त प्रमाणात पाणी टाळावे.
10) जेवणामध्ये कोमट पाणी वापरावे.
11)
विशेष म्हणजे अम्लपित्त, मलावष्टम्भ, अपचना संबंधी कुठलाही त्रास असल्यास
त्यावर लवकरात लवकर आयुर्वेदिय पध्दतीने ओषधोपचार व पंचकर्म करुन घ्यावे.
शरीरामध्ये
दोष जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्यांना कमी करण्यासाठी पंचकर्माची गरज पडते. यास
आपण Drastic
Cleansing Process "मोठ्याप्रमाणात वाढलेले दोष बाहेर
काढणे"
म्हणु शकतो. त्यामुळे शरीरात अनियत्रीत प्रमाणात वाढलेले दोष कमी होण्यास मदत
होते. शरीरावर मेद साचुन वाढलेले वजन कमी करण्यासाठी पंचकर्माचे विशेष महत्त्व
आहे. शरीरावर अतिरिक्त स्वरुपात वाढलेली चरबी कमी करुन शरीर सुद्रुढ बनवण्यास मदत
होते. त्यामुळे पकृतीनुसार व शरीरामध्ये
वाढलेल्या दोषानुसार योग्य त्या पंचकर्माची निवड करावे.
पोट
हा पचनासी संबंधीत अवयव आहे. त्यामुळे पचनामध्ये काय विकृती आली आहे याचे निदान
करुन ओषधोपचार करावा. यामध्ये अम्लपित्त, अजीर्ण, अपचन, मलावष्टभ, भुक न लागणे, बैठ्या व्यवसायामुळे पोटात वाढणारे
गेसेस, पाळीच्या तक्रारी, थायराईड, डिलेव्हरीनंतर वाढणारे वजन व अनुवंशीकते प्रमाणे येणारा स्थुलपणा
यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
योग्य ते निदान करुन ओषधोपचार केल्यास यापासुन सुटका मिळु शकते. हे मात्र निच्शित.
योग्य ते निदान करुन ओषधोपचार केल्यास यापासुन सुटका मिळु शकते. हे मात्र निच्शित.
व्यायाम:-
सुर्यनमस्कार,
अनुमोल-विलोम,
भास्रीका,
कपालभाती,
ताडासन,
फ़िरण्याचा
व्यायाम
Waling
Running
Cycling
DR. SACHIN GAIKWAD – PATIL
MD (Ayurveda) Pune
Regd.No. I-66633-A
Consulting Ayurvedic Physician
Call: - 8275183419
8237523722
drsachin.ayu87@gmail.com
PUNE
CHANDRAMA AYURVEDA
A-305, Srushti Housing
Society,
Near Hotel Magnolia,
Baner Road, Baner, Pune
CLINIC: - Saturday
& Sunday (2nd & 4th )
Time: - 11 am to 7 pm
AURANGABAD
SHREE VISHWANKUR AYURVEDA
Pushpai Building, 1st Floor, Near HDFC Bank,
Nirala Bazar, Nageshwar wadi Road, Aurangabad.
TIME: - 10.30 am to 2 pm / 5 pm to 9 pm
Very helpful !! Surely I will follow, Sir.
ReplyDeleteGood
ReplyDelete