रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद

रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद

 
                             
        २१ व्या शतकात सर्व आरोग्यविषयक सोयी सुविधा असूनही आपल्या आरोग्याचे हाल होताना दिसत आहे. लोकांची प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने अशा आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. असे ऎकल्यावर एक प्रश्न डोळ्यासमोर आला की, साधारणतः १००-२०० वर्षांपूर्वी राहण्या-खाण्याची, आरोग्याची व्यवस्था नसणारे लोक असे सारखे-सारेखे आजारी पडत असतील का? तसे होत नसल्याचे लक्षात आले. कारण की त्या काळी लोकांची प्रतिकार शक्ती चांगली असल्याचे ऎकायला मिळाले. १००-२०० वर्षांपूर्वीचे राहणीमान आज स्वीकारणे तर शक्य नाही, मग प्रतिकार शक्ती वाढवणार-या काही उपचार पध्दती आरोग्य क्षेत्रात उपलब्ध आहे का? याचा मागोवा घेण्याचे ठरविले.


        आज आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक उपचार पध्दती आहेत. जसे की, आधुनिक उपचार, होमिओपॅथी उपचार, नॅचरोपथी उपचार, आयुर्वेदिय उपचार, नवीन येऊ घातलेली चायनिज उपचार पध्दती. यापैकी कुठली उपचार पध्दती आपल्याला प्रतिकार शक्ति व आरोग्य या दोन्हीसाठी उपयोगी पडू शकते? असा प्रश्न साहजिकच सामान्य माणसाच्या मनात येऊ शकतो.

यापैकी आयुर्वेद ही एकमेव उपचार पध्दती आहे जी प्रतिकार शक्ती वाढवणे व आरोग्य टिकवणे या दोन्ही गोष्टीसाठी उपयोगी पडू शकते.

“स्वस्थस्य स्वास्थरक्षणं व्याधितानां व्याधिपरिमोक्षःII” (चरक संहिता प्रथम भाग)

आयुर्वेदाचा आद्यग्रंथ चरक संहिता मध्ये वरील प्रमाणे उल्लेख आलेला आढळतो. यामध्ये “स्वस्थ (निरोगी) व्यक्तीचे स्वास्थ (आरोग्य)चे रक्षण करणे व रोगी व्यक्तीला रोगा मुक्त करणे” हा आयुर्वेदाचा मुळ उद्देश सांगितला आहे. वरील श्लोकामध्ये निरोगी व्यक्तिचे आरोग्य टिकवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे, त्यानंतर आजारी व्यक्तीचे उपचार करावे, असा क्रम देण्यात आलेला आहे. याठिकाणी व्यक्ती निरोगी राहावा यासाठी विशेष प्रकाराने काळजी घेणे, औषधोपचार करणे असे आयुर्वेदामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. 
निरोगी असल्यावर औषधोपचार करणे हे काही आपल्याला फारसे काही पटणारे नसते, त्यातही आयुर्वेदातील कडू औषधी तर मुळीच नको. परंतु एखाद्या चाणाक्ष ग्राहकाप्रमाणे आपण या गोष्टीचा फायदा घ्यायला हावा. तुम्ही म्हणाल आजारी न पडण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे लसीकरण करतो. मग आयुर्वेदच का घ्यावे? त्यातून वेगळे काय मिळेल? हे नेहमीचे प्रश्न आहेत.

      आयुर्वेदानुसार मनुष्य देह हा रस-रक्त-मांस-मेद-आस्थि-मज्जा-शुक्र अशा सात धातुपासून बनलेला आहे. शरीरातील सर्व अवयवांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या सात धातुची उपस्थिती असतेच. बालवस्थ्येमध्ये (साधारणतः १६-२० वर्ष) या सर्व धातुची वाढ पूर्ण होते. त्यानंतर शरीराची झीज सुरू होते. ज्याच्या शरीरामध्ये झीज जास्त प्रमाणात होते तो जास्त आजारी पडतो, लवकर म्हातारा होतो. ज्याच्या शरीराची झीज कमी प्रमाणात होते त्याचे आरोग्य व जीवनमान चांगले राहते.

       या सर्व धातुंचे बल चांगले ठेवणारे, त्याची वाढ करणारे, त्यांना मजबुती देणारी औषधी फक्त आणि फक्त आयुर्वेदामध्येच आहे. आयुर्वेदातील चरक संहीता या ग्रंथामध्ये चिकित्सा सांगताना पहिल्या प्रकरणामध्ये या औषधाचा सखोल उल्लेख केलेला आहे. या उपचारांना ‘रसायन उपचार’ असे म्हणतात.

      तुम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे? यासाठी आपण आपल्या राहात्या घराचे उदाहरण घेऊ. घर बांधताना लागणारी साधन सामुग्री जसे विटा-सिंमेट-सळई-वाळु-प्लास्टर चांगल्या प्रतीचे घेतल्यास, चांगला रंग दिल्यास, व्यवस्थित निगा घेतल्यास घराचे आयुष्य वाढू शकते, भरपुर दिवस घराची डागडुजी करण्याची गरज पडत नाही. घर भक्कम तयार होते. तसेच मानवी शरीराचे देखील आहे. शरीरातील रस-रक्तादी धातु ही शरीररुपी घराची साधन-सामुग्री आहे. ते जेवढ्या चांगल्या प्रतीचे असतील, तेवढे शरीराचे आरोग्य चांगले व आयुष्य दीर्घ असते. अचानक येणारे भुकंप, वादळ हे एखाद्या आजारासारखे असते. घराची पकड भक्कम असल्यास भुकंप किवा वादळ आल्याने फारसे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असल्यास आजार लवकर होत नाही किंवा झालेले आजार लवकर बरे होतात.


   
    त्यामुळे शरीरे रुपी या मानवी घराची आपण नीट काळजी घेतलीच पाहिजे. आयुर्वेदानुसार आहार-विहार, पथ्य पालन, ऋतुनुसार पंचकर्म, रसायन, वाजिकर औषधी व औषधी उपचार घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पर्यायाने अवेळी येणारे आजारपण टळते. निरोगी व दीर्घ आयुष्य मिळण्यास मदत होते.

    
   त्यासाठी कुठलाही दुराग्रह टाळून आयुर्वेद उपचारांचा आपल्याला कशा प्रकाराने फायदा होऊ शकतो हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्ही आरोग्याविषयी एवढे निष्काळजी, निरक्षर का आहात हे पुढील पिढी विचारल्याशिवाय राहाणार नाही, एवढे मात्र नक्की.





Dr. Sachin Gaikwad-Patil. MD(ayu) pune. 
श्री विश्वांकुर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र  
drsachin.ayu87@gmail.com

Phone 8275183419 / 8237523722

(Please Visit And Subscribe)

Pune
 Chandrama Ayurveda, 
A-5 shrusti appartment,Near Magnolia Hotel, 
Someshwar chauk, baner road. Baner. Pune

Aurangabad
 Shree Vishwankur Ayurveda.
1st floor, Near HDFC Bank, Nirala Bazar, 
Nageshwarwadi Road, Aurangabad.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद