निद्रा (झोप) SLEEP

 #sleep #insomnia #treatmentforsleep #Ayurveda #Ayurvedatreatmentforsleep #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad #Cicardiancycle #Ayurvedapanchakarama #depression # निद्रा #झोप

निद्रा (झोप)
         जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) झोप ही निरोगी आयुष्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. आज जगभरात अनेक लोक झोप न येण्याच्या त्रासा पासुन त्रस्थ आहेत. रात्री योग्य वेळी पुरेषी झोप न झाल्यास शरीराचे नैसर्गिक चक्र (Cicardian Cycle) भिघडुन आनेक आजारांना आमंत्रण मिळते. या सर्व आजारांना आळा घालण्यासाठी झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे. 
          निद्रा शरीरधारणेस मदत करते व अरोग्याचे रक्षण करुन आरोग्यसंपन्नतेला हातभार लावते. दररोज सर्वसामान्यपणे सुर्योदयापुर्वी एक ते दीड तास आधी, सुमारे सात तासांची झोप पुर्ण होईल, अशा अंदाजाने प्रत्येक व्यक्तीने रात्री शरीरे व मनास टप्प्याटय्याने संपुर्ण  शांत करुन, स्वतःला निद्रेच्या स्वाधीन करावे. 
         जेव्हा मन व इन्द्रियेही थकतात, त्यावेळी स्रोतसे कफ़ाने आवृत होतात आणि इन्द्रिय त्यांच्या विषयापासुन निवृत होऊन, मनुष्य निद्रेच्या अधीन होतो. त्यावेळी शरीरातील सर्व अवयवांना रात्रीच्या वेळेला विश्रांती मिळते, दिवसभर झालेली झीज भरुन येण्यास मदत होते. 
          योग्य वेळची निद्रा शरीरात उत्साह निर्माण करते, अग्नी प्रदिप्त होतो, अन्नाचे पचन चांगले होते. त्यामुळे अन्न अंगी लागुन शरीरे सुद्रुढ व बलवान होते. मल-मुत्र व वात सहजरीत्या बाहेर पडतो. शरीरातील सर्व घटक समप्रमाणात निर्माण होतात. धातुंचे पोषण होते. शरीरात बल व उत्साह निर्माण होतो. बुध्दी,स्मॄती, एकाग्रता वाढते. त्वचा सतेज व निर्मळ होते. म्हणजे आपल्या लक्षात येईल की, स्वास्थ्यासठी, त्वचा सतेज व सुंदर दिसण्यासाठी तसेच बुध्दी व स्मरणशक्ती बलवान होण्यासाठी योग्य वेळची, योग्य कालावधीची निद्रा ही अत्यंत आवश्यक आहे. नुसते सौदर्यप्रसाधने वापरुन त्वचेच्या सौदर्ययात तात्पुरती भर पडते. 
          
       रात्रीच्या वेळेला साधारणतः ७ तास झोप घेणे आवश्यक आसते. रात्री जागरणामुळे किंवा उशीरा झोपल्यामुळे शरीरामध्ये कोरडेपणा(वात) व उष्णता (पित्त) दोष वाढतात. वातदोषामुळे शरीरातील देहस्य धातु रुक्ष होतात. मल हा शुष्क व कोरडा होतो. त्याचा अवरोधही होतो व मलावरोधाची सवय लागते. मलवरोधामुळे अग्नी मंद होतो, वारंवार अजीर्ण, अपचन होते, अम्लपित्त, मळमळणे, छाती-पोटात आग होणे, भुक न लागणे, केस गळणे, केस रुक्ष होणे, त्वाचा रुक्ष होणे, निस्तेज होणे, ही लक्षणे उत्पन्न होतात. 
     रात्री उशिरा झोपल्यामुळे पित्तदोष वाढतो व त्यामुळे घशाशी जळजळ होणे, आंबट येणे, अल्मपित्त होते, मळमळणे, छाती-पोटात आग होणे, त्यामुळे रक्त दुषीत होऊन त्वाचा रोग, सोरायसिस, वांग, मुरमे, चेह-यावर काळे डाग, त्वचा काळी पडणे ईत्यादी आजार निर्माण होतात. सध्या तरुण पिढी तर रात्री बहुतेक बारा एक च्या नंतरच झोपतात. त्याचबरोबर तिखट-आंबट-खारट जास्त प्रमाणात खण्यात असल्यामुळे शरीरातील पित्त दोष वाढुन त्वचा विकार, केसाचे विकार, माणसिक ताणतणावात वाढ झालेली दिसते. 

        
    जागरणामुळे वाढलेले वात व पित्त दोष शरीरातील रस, रक्त, मज्जा, अस्थि धातु तसेच ह्रद्य व मष्तिकवर सर्वात अगोदर परिणाम करतात. रात्री आवश्यक ती विश्रांती न मिळाल्यामुळे ह्द्यावर आतिरिक्त ताण येण्याची शक्यता आसते. यामुळे हद्रयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हर्मोनल आजार, माणसिक ताणतणाव वाढुन नैराश्य (Depression) येण्याची शक्यता आसते. मज्जा धातुवर परिणाम झाल्यामुळे स्मृती कमी होणे, लवकर लक्षात न येणे, विसरभोळेपणा वाढणे ईत्यादी लक्षणे दिसतात. स्वभाव जास्त चिडखोर बनतो. 
            रात्रीच्या जागरणामुळे रस, रक्त, मज्जाधतु दुषित होत असल्यामुळे डोळ्याभवती त्वाचा काळी होऊ लागते, काळी वर्तुळे तयार होतात. त्यासाठी मिळणारी Under Eye Cream लावली असता तात्पुरता गुण येतो, त्याएवजी योग्य वेळेत पुरेशी झोप घेतली, तर हामखास गुण येतो. 
            ज्या विद्यार्थ्यांना रात्री उशिरा जागुण अभ्यास करण्याची सवय आहे, त्यांना ब-याच वेळा परिक्षेमध्ये पेपर लिहिताना काहीच आठावत नसल्याची तक्रार असते. या गोष्टीमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो व त्यांना एक प्रकारची भीती निर्माण होते. यावर काही उपाय आहे का? यासाठी पालक दवाखान्यात येतात. अशा वेळी अभ्यास करण्याची पध्दत बदलुन रात्री योग्य वेळी व पुरेशी निद्रा घेऊन सकाळी उठुन अभ्यास करणे, हा एकच उपाय गुण देणारा असतो, असा अनुभव आहे. पुरेशी व शांत निद्रा ही सक्षम बुध्दीसाठी अत्यंत आवश्यक असते. 

त्याच प्रमाणे शारीरीक व मानसिक आजाराचा परिणाम स्वरुपात झोप येत नसल्यास यासाठी आयुर्वेदिय औषधोपचार, पंचकर्म, शिरोधारा ई करावे. तसेच प्रक्रुती नुसार बुद्धी वाढण्यासाठी रसायन औषाधांचा वापर करावा. त्यामुळे पाल्याची शाळेतील प्रगाती, सामाजिक प्रगाती व मानसिक प्रगती चांगली होऊ शकते.

साधारण उपचार:
1) योग्य वेळी योग्य झोप घेणे महत्वाचे, रात्री कमीत कमी ७ तास झोप घ्यावी, साधारणातः १० ते ६ वाजेच्या दरम्यान झोपावे.
2) तळपायाला काश्याच्या वाटीने गाईचे तुप व एरंड तैल समप्रमाणात एकत्र करुण चोळावे.
3) शरीरावर थंडीत तीळतैल व उन्हाळ्यामध्ये चंदनबला तैलाने मालिश करुन, कोमट पाण्याने स्नान करावे.
4) रात्री झोपतानी डोक्यावर हळुवारपणे तैल चोळावे. (ब्रामी तैल किंवा प्रक्रुती प्रमाणे अन्य)
5) मानसिक ताणतणाव असल्यास तो कमी करण्यासाठी आयुर्वेदिय वैद्यांचा सल्ला घ्यावा. दिनचर्या, आहार विहार समजुण घ्यावा. त्याप्रमाणे आचरण करावे. 

पंचकर्म:-
1) शिरोधारा
2) नस्य
3) शिरोभ्यंग
4) सार्वांग अभ्यंग
5) पादाभ्यंग
6) बस्ती (वात दोषासाठी)
7) विरेचन (पित्त दोषासाठी)

पथ्य :-
1) चहा- कोफ़ी ई. उत्तेजक पदार्थ टाळावे.
2) व्यसन- दारु- सिगारेट ई. गोष्टी टाळाव्यात.
3) वातुळ पदार्थ - टिखट पदार्थ टाळावे.
4) अवेळी जेवण टाळावे.
5) शिळे, आंबवलेले, बेकरी प्रोडक्ट, टाळावे.

1) दुध, तुप, डाळिंब, मनुका, आवळा, अजींर, स्नीग्ध पदार्थ ई. सत्वीक आहार असावा.

जीवनशैली बदल :-
1) जेवणाच्या वेळा नियमित असावी.
2) उपवास टळावा
3) जागरण टाळावे.
4) झोपण्यापुर्वी १/२ तास टीव्ही, मोबाइल, लापटोप बंद करावा.

व्यायाम :-
1) नियमित साकाळी फ़िरण्याचा व्यायाम करावा.
2) नियमित योगासने करावेत. जसे- प्राणायाम, शितली प्रणायाम, अनुलोम-विलोम प्रणायाम,
3) नियमित ध्यान, धारणा करावी. ओंकार जप करावा.
4) नियमित सुर्यनमस्कार करावेत.  

 

              वरील उपायाने साधारणतः झोपेमध्ये सुधारणा होऊ शकते. परंतु काही लोकांमध्ये एखाद्या आजारामुळे झोप होत नाही. उदा:-पोट खराब असल्याने , आव पडात असल्याने, आम्लपित्ताचा त्रास असल्याने, गसेस चा त्रास असल्याने, मलावरोध असल्याने, त्वाचा विकार, सोरायसिस असल्याने अनिद्रा चा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारामध्ये मुळ आजार व अनिद्रा या दोन्ही वर उपचार होणे आवश्यक आहे, नुसते झोपेच्या गोळ्या घेऊन भागत नाही.



             यासाठी आयुर्वेदिय औषधी व पंचकर्मा यांचा उत्तम उपयोग होऊ शकतो. आयुर्वेदिय औषधी शंखपुष्पी, जटामांसी, ब्राम्ही, शतावरी, सारीवा या वनस्पतींचा उपयोग सल्ल्याने केल्यास चांगला अराम मिळु शकतो. तसेच पंचकर्मातील शिरोधारा, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, अभ्यंग, मालिश-शेक, बस्ति कर्माचा उपयोग करुन यथायोग्य लाभ मिळवता येतो. त्यामुळे झोप न येणे, व्यवस्थित झोप न होणे याकडे दुर्लक्ष करु नये, त्यावर वेळीच आयुर्वेदिय उपचार करुन अरोग्याचे रक्षण करावे. 

Dr. Sachin Gaikwad-Patil
MD(Ayurveda),Pune
8237523722
8275183419
PUNE
@ Chandrama Ayurveda Center
A-5 Shruti Appt. Near Hotel Magnolia 
Baner Road Baner Pune 

AURANGABAD
@ Shree Vishwankur Ayurveda Center
Near HDFC Bank, 
Nirala Bazar, Aurangabad

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद