SUCCESS STORY (तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे येणाऱ्या वंध्यत्वासाठी 'आयुर्वेद' एक खात्रीशीर पर्याय)
साधारण एक वर्षापूर्वी एक विवाहित जोडपे उपचारासाठी दवाखान्यामध्ये आले होते. ओळखीतील असल्यामुळे थोड्याशा गप्पा झाल्यावर एकाने अडखळात-अडखळत वंध्यत्वासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का, असे विचारले. डॉक्टरांच्या मते स्री व पुरुष दोघांमध्ये कुठलाही दोष नाही, स्री व पुरुष बीजाची संख्या, रचना अगदी व्यवस्थित व आवश्यक तेवढी आहे, गर्भाशयासंबंधी कुठलाही आजार नाही, पाळीदेखील नियमित व स्वस्थ आहे, गर्भ राहण्यास कुठलाही अडथळा नाही, असे सांगण्यात आले होते. परंतु गर्भ काही केल्या राहत नव्हता. हे सांगत असताना दोघांच्या मनातील व्यथा लक्षात येत होती. रुग्ण ग्रामीण भागातील असल्यामुळे आधुनिक उपचाराचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नव्हता.
विविध रिपोर्ट्सची मोठी फाईल
त्यांनी माझ्या समोर ठेवली. रुग्णाने
सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट तर सामान्य दिसत होता. या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी
रुग्णाचा इतिहास जाणून घेण्याचे ठरवले. यामध्ये भूक उत्तम, झोप उत्तम, पोट
व्यवस्थित साफ होत असे, पाळी
व्यवस्थित व नियमित कुठल्याही त्रासाशिवाय येत होती. त्याचप्रमाणे आहारही
व्यवस्थित होता. फक्त खाण्यामध्ये तिखटाचे प्रमाण अधिक होते व पुरुषाला तंबाखू
खाण्याची सवयी होती.
अन्य काही इतिहास न
मिळाल्यामुळे फक्त तंबाखू खाणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन
औषधोपचार सुरू केले. तंबाखू वर्ज्य करण्यास सांगून तीन महिने
नियमित औषधोपचार व पंचकर्म करण्यास सांगितले.
तीन महिन्यांनंतर रुग्ण
पूनर्तपासणीसाठी आल्यावर त्या स्त्रीने पाळी चुकल्याचे सांगितले. हे सांगताना
दोघांच्या चेह-यावरील आनंद अगदी स्पष्टपणे दिसत होता. रुग्णाला प्रेगनन्सी टेस्ट
करण्यास सांगितले व टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर स्रीरोग तज्ज्ञाचे
मत घेऊन गर्भधारणा राहिल्याचे निश्चित करण्यात आले. पुढील नऊ महिन्यापर्यंत
प्रत्येक महिन्यानुसार आयुर्वेदिय औषधोपचार करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एक
गुटगुटीत अपत्य त्यांना झाले.
मागील आठवड्यात ते रुग्ण
भेटायलाआल्यावर या सर्व गोष्टींना पुन्हा उजाळा मिळाला. रुग्णाने कुतूहलापोटी आधी
त्यांना गर्भ का राहत नव्हता असे विचारले. मी त्यांना लगेच प्रतिप्रश्न केला, तुम्ही तंबाखू खाणे चालू केले का? तर रुग्णाने नकारार्थी मान डोलावली. हेच तर माझे उत्तर होते.
तिखट पदार्थ,
तंबाखू अतिप्रमाणात घेतल्यामुळे
शरीरातील पित्त दोष अति प्रमाणात वाढतो. वाढलेला पित्त दोष पचन संस्था, रक्तधातु, मज्जाधातु
व शुक्रधातुवर विपरित परिणाम करतो. शुक्रधातुमधील पित्तदोषाचे प्रमाण वाढल्यामुळे
शुक्राची गर्भधारणा करण्याची क्षमता कमी होते. तसेच वाढलेले पित्त रक्तामध्ये दोष
निर्माण करते. याचा विपरित परिणाम मज्जावह संस्थावर होऊन मानसिक अस्वस्थता निर्माण
होते. त्यामुळे देखील मूल होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. पित्तदोषामुळे शरीरातील
उष्णता वाढल्यामुळे मुत्रातील PH मध्ये बदल होतो. हा मुत्रदोष देखील वंध्यत्वास
कारणीभूत ठरू शकतो. पित्तदोषामुळे पचनसंस्थेच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.
व्यवस्थित पचन न झाल्यामुळे शारीरिक धातुचे व पर्यायाने शुक्रधातुचे पोषण
व्यवस्थित होत नाही. याचा शुक्रधातुच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम दिसून येतो.
उपचारासांठी वरील सर्व
गोष्टींचा विचार आयुर्वेदामध्ये प्राधान्यांने करण्यात येतो. त्यानुसार औषधी, पंचकर्म व आहार-विहाराचे नियोजन केले जाते. नियोजनानुसार
सर्व उपचार झाल्यास सहज यश मिळू शकते. शरीरातील अतिरिक्त पित्तदोष कमी करुन, शुक्रधातु शुध्द करुन शुक्रधातुची गुणात्मक वृध्दी केल्यास
गर्भधारणा होण्यास मदत मिळते. वरील केसमध्ये आपण याच चिकित्सासुत्राचा उपयोग केला.
हे सर्व ऎकुन त्या रुग्णांच्या चेह-यावर समाधान जाणवले.
अनेक जण तंबाखू व अतिप्रमाणात
तिखट अगदी नित्यनियमाने खात असतात. त्याचा अारोग्यावर खोलवर व गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा थोडासाही विचार ते करत नाही. निरोगी आरोग्याची इच्छा
बाळगऱ्यांनी व अपत्य इच्छुकांनी तर या गोष्टींपासून दोन हात दूर राहण्यातच समजदारी
आहे.
आयुर्वेद हे कुठल्याही आजारावर
मुळापासून काम करणारे शास्र आहे. त्यामुळे कुठलाही दुराग्रह टाळून आपल्या
आजारांसाठी आयुर्वेदिय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आयुर्वेदीय उपचारांमुळे
अशक्य वाटणा-या गोष्टी चुटकीसरशी सुटू शकतात, हे शेवटी
गुण आलेल्या रुग्णांच्या अनुभवावरून कळतेच.
धन्यवाद
डॉ. सचिन गायकवाड, एम.डी., (आयुर्वेद)
संपर्क:- 8237523722 / 8275183419
श्री विश्वाकुंर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
पुणे
औरंगाबाद
Comments
Post a Comment