रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद
रोग प्रतिकारशक्ती आणि आयुर्वेद २१ व्या शतकात सर्व आरोग्यविषयक सोयी सुविधा असूनही आपल्या आरोग्याचे हाल होताना दिसत आहे. लोकांची प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने अशा आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. असे ऎकल्यावर एक प्रश्न डोळ्यासमोर आला की, साधारणतः १००-२०० वर्षांपूर्वी राहण्या-खाण्याची, आरोग्याची व्यवस्था नसणारे लोक असे सारखे-सारेखे आजारी पडत असतील का? तसे होत नसल्याचे लक्षात आले. कारण की त्या काळी लोकांची प्रतिकार शक्ती चांगली असल्याचे ऎकायला मिळाले. १००-२०० वर्षांपूर्वीचे राहणीमान आज स्वीकारणे तर शक्य नाही, मग प्रतिकार शक्ती वाढवणार-या काही उपचार पध्दती आरोग्य क्षेत्रात उपलब्ध आहे का? याचा मागोवा घेण्याचे ठरविले. आज आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक उपचार पध्दती आहेत. जसे की, आधुनिक उपचार, होमिओपॅथी उपचार, नॅचरोपथी उपचार, आयुर्वेदिय उपचार, नवीन येऊ घातलेली चायनिज उपचार पध्दती. यापैकी कुठली उपचा...