Posts

Showing posts from December, 2019

जुनाट सर्दी अ‍ॅलर्जी वर आयुर्वेदिय उपचार

Image
सर्दी १२ आठवडय़ांपेक्षा अधिक टिकत असेल तर त्याला जुनाट सर्दी किंवा ‘ क्रॉनिक सर्दी ’ म्हणतात. जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अ‍ॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते.   काही व्यक्तींना विशिष्ट अशा आहार , वातावरण यांच्या संपर्काने अथवा सहवासाने वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागतो. उदा. शिंका येणे , डोळे लाल होणे , डोळे खाजणे , नाक वाहने इत्यादी. तेव्हा आपण त्या व्यक्तीला विशिष्ट अशा आहार , वातावरण याची अ‍ॅलर्जी आहे , असे समजतो. ‘ अ‍ॅलर्जी म्हणजे नक्‍की काय ?’ अ‍ॅलर्जी याचा व्यवहारात अर्थ ‘ सहन न होणे ’ विश्‍वातील सजीव किंवा निर्जीव ,   द‍ृश्य किंवा अद‍ृश्य अशा कोणत्याही पदार्थाची उदा. थंडपाणी , थंड हवा , धूळीकण इत्यादीपासून ते विशिष्ट कपडे , गंध , प्रकाश अन्‍नपदार्थ पर्यंत कोणत्याही घटकाची अ‍ॅलर्जी असू शकते. म्हणजेच असे त्रास देणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संबंधात आल्यानंतर तेथील पेशींना ते सहन होत नाहीत व परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्‍न होऊन शरीर असा पदार्थ नाकातून , घशातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच शिंका येतात किंवा ठसका ...

निद्रानाश - मधुमेहास आमत्रंण

Image
निरोगी आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तास झोप अत्यावश्यक असते. परंतु , बदलत्या जीवनशैलीमुळे , कामाच्या स्वरुपामुळे , स्पर्धेमुळे शरीराला पुरेशी झोप मिळणे दुरापास्त होत चालले आहे . त्यात टेलीव्हिजन , इंटरनेट आणि इतर मनोरंजनाची साधने अजुनच भर घालत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की, मधुमेह आणि निद्राविकाराचा संबंध काय ? खरंतर, निद्राविकारामुळे मधुमेह होण्याची शक्यता बळावते आणि मधुमेहामुळे निद्रेवर परिणाम होतो. अमेरिकन डायबीटीस असोसिएशनच्या अहावालानुसार, ५ तासापेक्षा कमी झोप घेणा-या व्यक्तींना डायबीटीस होण्याचा धोका जास्त असतो. नविन संशोधनानुसार निद्रानाशाचा त्रास असणा-या ४० वर्षाखालील व्यक्तीला टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. २८ , ००० व्यक्तींवर करण्यात आलेल्य संशोधनानुसार हा निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कमी झोप - मधुमेहाचे मुख्य कारण रात्री उशिरा झोपणं , रात्रपाळी करणं किंवा इतर काही कारणांमुळे पुरेशी झोप होत नसेल , तर भविष्यात मधुमेह होण्याचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावांमुळे इन्शुलिनचे कार्य बिघडते आणि अशा लोकांना मधुमेह होण्याचा मोठा धोक...