Posts

Showing posts from June, 2017

पाळीच्या वेळी होणा-या विविध तक्रारी

Image
पाळीच्या वेळी होणा-या विविध तक्रारी कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्री ही कुटुंबांच्या मध्यस्थानी असते. तिच्यावर कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक कामाच्या जबाबदा-या व ताण असतो. या सर्व व्यस्त दिनक्रमामध्ये तिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, वेळ मिळूनही ती स्वतःच्या आरोग्याला विशेष महत्त्व देत नाही. स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करताना प्रत्येक महिन्याला नियमितपणे येणा-या मासिक पाळीचा विचार न करून कसे चालेल. ही तिला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे, ज्याद्वारे शरीरातील दोष प्रत्येक महिन्याला बाहेर टाकले जातात. खरंतर, पूर्वीच्या काळी स्त्री आरोग्याचा तक्रारी कमी होत्या. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पाळीकडे होणा-या दूर्लक्षामुळे पाळीच्या तक्रारी वाढल्या व पर्यायाने स्त्री आरोग्याच्या तक्रारी वाढल्या. वेगवेगळ्या आजाराचे निदान करण्यासाठी आलेल्या स्त्री रुग्णांना पाळी संबंधी काही त्रास आहे का विचारल्यास "नोर्मल आहे, काही त्रास नाही, थोडी मागे-पुढे होते, थोडे अंगावरुन कमी-जास्त जाते" असे सहज व दुर्लक्षित उत्तर मिळते. याविषयी जास्त खोलात जाऊन विचारल्यास असे लक्षात ...

स्त्रियांची मासिक पाळी व आयुर्वेद

Image
स्त्रियांची मासिक पाळी व आयुर्वेद स्त्रियांमध्ये     मासिक   पाळीची   सुरुवात   साधारणतः   १२   ते   १६   व्या   वर्षी   होते .  आयुर्वेदानुसार   १६   वर्षापर्यंतच्या   वयाला बालवय   म्हणतात .  परंतु   स्त्री   शरीरात   प्रकृतीनुसार ,  आहारानुसार   शार ीरि क   परिपकत्व   हे   १२ ,  १३ ,  १४ ,  १५ ,  १६   व्या वर्षापर्यंत   येत   असल्याने   तारुण्याची   सुरुवात   मुलापेक्षा   लवकर   होते .  हा   काळ   क फ धातुचा   असल्याने   या   काळामध्ये सर्व   धातुचे   ( रस ,  रक्त ,  मांस ,  मेद ,  अस्थि ,  मज्जा ,  शुक्र )  पोषण   उत्तम   प्रकारे   होत   असते . यानंतर साधारणतः १२ ते १६ या वयात प्रकृतीनुसार, देशानुसार, काळानुसार स्त्रियांना रजोदर्शन (Menstrual Cycle) सुरू होतात. साधारणतः या काळामध्ये मुली हट्टी बनत...