Skip to main content

स्त्रियांची मासिक पाळी व आयुर्वेद

Striyanchi pali

स्त्रियांची मासिक पाळी व आयुर्वेद

स्त्रियांमध्ये  मासिक पाळीची सुरुवात साधारणतः १२ ते १६ व्या वर्षी होतेआयुर्वेदानुसार १६ वर्षापर्यंतच्या वयालाबालवय म्हणतातपरंतु स्त्री शरीरात प्रकृतीनुसारआहारानुसार शारीरि परिपकत्व हे १२१३१४१५१६ व्यावर्षापर्यंत येत असल्याने तारुण्याची सुरुवात मुलापेक्षा लवकर होतेहा काळ धातुचा असल्याने या काळामध्येसर्व धातुचे (रसरक्तमांसमेदअस्थिमज्जाशुक्रपोषण उत्तम प्रकारे होत असते.
यानंतर साधारणतः १२ ते १६ या वयात प्रकृतीनुसार, देशानुसार, काळानुसार स्त्रियांना रजोदर्शन (Menstrual Cycle) सुरू होतात. साधारणतः या काळामध्ये मुली हट्टी बनतात, रुसवाफुगवा सुरू होतो. हे हवंय, ते नको, हे करणार नाही, ते करणार नाही, अशा प्रकारचे बदल स्वभावात आढळून येतात. या काळामध्ये मुली स्वतःचे मत बनवायला व व्यक्त करायला लागतात. शरीरातील शुक्र धातु अभिव्यक्त होत असल्याची ही लक्षणे असून याच काळात स्त्री शरीरातील ’आग्नेय’ गुण वाढतो, स्त्रीबाह्य (योनीभाग) व आभ्यंतर अवयव (गर्भाशय, आर्तववाहिन्या, फलकोष, अपथ्यपथ्य) इत्यादी स्त्री विशिष्ट अवयवांची वाढ व कार्य सुरू होते.
याकाळात अभिव्यक्त होणारा शुक्र धातु हा प्रजननासाठी आवश्यक असणारा धातु आहे. आयुर्वेदानुसार हा धातु सर्व शरीरव्यापी असून रजोदर्शनापर्यंत (मासिक पाळी सुरू होण्याचा काळ) इतर धातु, अवयव, शरीरप्रणाली यांच्या जडणघडणेत (उत्पादनात) महत्त्वाचे कार्य करतो. साधारणतः १६ वर्षापर्यंतच्या काळात सर्व शरीराचा विकास होतो, त्यानंतर प्रजोत्पादन हेच याचे मुख्य उद्देश राहते.
वरील गोष्टीचा संदर्भ असा की, रोज घेतल्या जाणा-या आहारासापासून रसधातु तयार होतो जो शरीरातील आद्य धातु होय. त्यापासून तयार होणारे उपधातु रज अर्थात मासिक स्त्राव व स्तन्य अनुक्रमे गर्भाशय व स्तन्याशय यांचे पोषण करतात. बालवयामध्ये विशेषतः रजोप्रवृत्ती सुरू होत असताना योग्य आहार - विहार याकडे लक्ष न दिल्यास त्याचा परिणाम रसधातु मार्गे रजधातु व स्तन्यधातु यावर होतो. त्याचा परिणाम प्रजननसंस्था व सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर वर दिसू लागतात.
आजच्या तरुण मुली बांधा सडपातळ राहावा यासाठी शरीराला आवश्यक व पथ्यकारक असा पोषक आहार दुध, तुप, लोणी या स्निग्ध पदार्थाचे मुळीच सेवन करत नाही. सकाळी शरीरपोषक असा आहार न घेता, चहा, बिस्किट, ब्रेड, टोस्ट अशा रुक्ष फास्ट फुडवर भर देतात. अनियमित जेवण, रात्री जागरण, आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम, तणावग्रस्त जीवनपद्धती, अतिक्रोध अशी त्यांची जीवनपद्धती असते. यामुळे वात वाढतो, रूक्षता वाढते, शरीरातील स्निग्धता कमी होते, परिणामी शरीरातील स्निग्ध घटक (रस-रक्त-शुक्र) कमी होऊ लागतात. परिणामी रजःस्त्रावाची (मासिक स्त्राव) निर्मिती कमी होते, मासिक पाळी अनियमित होते, कमी प्रमाणात स्त्राव होतो किंवा कमी दिवस स्त्राव होतो, पाळीच्या पुर्वी व पाळीच्या काळात पोट दुखते, चिडचिड होते, मानसिक अरोग्यावर परिणाम होतो, वजन वाढते किंवा एकदम कमी राहते, त्वचा कोरडी पडते, केस गळतात.
काही स्त्रियांना तर मासिक पाळीच्या काळात वेदनाशामक गोळ्या घ्याव्याच लागतात. हा त्रास हल्ली सर्रास बघायला मिळतो. त्यामुळे आहार- विहाराची विशेष काळजी घेणे हे करिअर इतकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे.
दोन मासिक पाळ्यांमध्ये साधारणतः २५ ते ३२ दिवसांचे अंतर असणे स्वभाविक मानले जाते. अग्नीच्या पचनशक्तीनुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. या काळात होणारा मासिक स्त्राव तीन - चार दिवस होऊन पाचव्या किंवा सहाव्या दिवशी बंद होतो. हा मासिक स्त्राव पहिल्या दिवशी कमी, तिस-या किंवा चौथ्या दिवसापर्यंत क्रमाने वाढतो व त्यानंतर कमी होत जातो.
या काळात कुठलाही त्रास न होणे, हे चांगल्या आरोग्याचे लक्षण समजावे. या काळात होणारा स्राव हा लाल रंगाचा, विशिष्ट गंध असणारा, गाठी व चिकटपणा नसलेला, स्त्रावाचा कपड्यावरील डाग पाण्याने धुतल्यास पूर्णपणे जाणारा असतो, स्त्रावादरम्यान जळजळ व वेदना न होणारा असतो. अशा प्रकारचा स्त्राव शुध्द व प्राक्रुत समजावा. अशा नैसर्गिक पाळीमुळे गर्भाशयाचे कार्य व्यवस्थितपणे चालू आहे, हे लक्षात येते.
तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात पाळी ही अनियमित असते, तसेच स्त्रावाचे प्रमाणही कमी- जास्त असते. त्यामुळे आईला मुलीची काळजी वाटू लागते. सुरुवातीला मासिक पाळीच्या संबधीत सर्व घटक पूर्णतः व व्यवस्थित कार्यरत न झाल्यामुळे असे होते. साधारणतः १-२ वर्षात पाळीशी संबधीत सर्व घटक पूर्ण विकसित झाल्यावर पाळी नियमित येऊ लागते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनियमितता असल्यास विशेष काळजी करण्यासारखे नसते, परंतु २-३ वर्षाच्या पुढे जर अनियमितता असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करावेत.
शरीरातील शुक्रधातु बलवान झाल्यावर स्त्री विशिष्ट बाह्य व आभ्यंतर (बीजग्रंथी, गर्भाशय, बीजवाहिनी नलिका इ.) अवयवांची वाढ होते व पाळी नियमित येते. मासिक पाळीने शरीर शुध्दीप्रक्रिया व्यवस्थित प्रस्थापित झाल्यामुळे तारुण्यात पदार्पण करणा-या मुलीचे सौंदर्य नैसर्गिकपणे सर्वांगाने फुलण्यास सुरुवात होते. नियमित येणा-या पाळीत अनियमितता निर्माण झाल्यास विविध आरोग्यविषयक समस्यांना आमत्रण मिळते. या अनियमितपणाचा परिणाम प्रजनन संस्थेवरही होऊ शकतो.
महत्त्वाचे असे की, पाळीचा स्त्राव व्यवस्थित बाहेर पडणे, हे वात दोषाचे कार्य आहे. तो वायु पाळीसह मलमुत्र विसर्जनाचे कार्य करतो. मलमुत्राच्या अवरोधामुळे तो विकृत होतो. याचा उल्लेख येथे यासाठी की, घरातील कामाच्या किंवा ऑफिसमधील कामाच्या नादात, प्रवासामध्ये किंवा सार्वजनिक शौचालयच्या अभावामुळे या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होते किंवा ब-याचदा गरज नसताना देखील मलमुत्राचा अवरोध होतो. स्त्री आरोग्याच्या बाबतीत, प्रजनन संस्थेच्या आजाराच्या बाबतीत ही अतिशय घातक व भयावह सवय आहे. शरीराच्या बाहेर पडणा-या निरूपयोगी गोष्टीचा सवयीमुळे किवां नाईलाजाणे सचंय झाल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ही सवय काळजीपूर्वक टाळल्यास आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकते.
आहाराचे पोटात अग्निच्या साहाय्याने पचन होते. त्यापासून सुरुवातीचा रस धातु तयार होतो, यापासून स्थन्य व रज(masik strava) नावाचे उपधातु तयार होतात. ते अनुक्रमे स्तन्याशय व गर्भाशय आणि गर्भाशयाशी सबंधित सर्व स्त्री विशिष्ट अवयवांचे पालन-पोषण करतात. त्यामुळे पाळीच्या सर्व अजारांमध्ये आहार अतिशय महत्त्वाचे कारण असू शकते.
मासिक पाळीचा घटनाक्रम हा यथायोग्य काळी स्त्री बीज व पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भाधारणा होण्यास महत्त्वाचा असतो. गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयातील गोष्टीच्या परिपोषणासाठी आत संचित घटक शरीराबाहेर् टाकणे आवश्यक असते. तसे न झाल्यास हा धातु शरीरात तसाच पडून राहतो व त्याचा दुष्परिणाम अन्य धातु (मुखतः रक्तधातु) वर येतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये प्रजननसंस्थे व्यतिरिक्त मधुमेह, लठ्ठपणा, संधिवात, मानसिक आजार अशा आजारांची सुरुवात होते. तर दुसरीकडे गर्भाशयातील अनावश्यक भाग बाहेर न पडल्यामुळे त्याच्या पोषणावर व विकासावरही परिणाम येतो. अशा प्रकारे शरीरामध्ये दर महिन्याला घटना घडत राहिल्यास त्याचा परिणाम स्त्री शरीरावर, प्रजनन संस्थेवर व मानसिकतेवर होतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्राव होत असताना गर्भाशायाच्या आतील भाग हा व्रणासारखा असतो. त्यामधून अनावश्यक भाग बाहेर टाकला जातो. त्यामुळे शरीरात दौर्बल्य जाणवते. या काळात विश्रांती आवश्यक असते. त्यामुळे शरीरावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होऊन, गर्भाशयाला विश्रांती मिळते व आतील घटना लवकर पूर्वस्थितीत येते. पाळीच्या दरम्यान विश्रांती घेतल्यास त्या नंतर येणारा थकवा, चिडचिडपणा, अस्वस्थता लवकर कमी होते, उत्साह वाढतो, कार्यक्षमता वाढते, चेह-याचा रंग खुलतो, मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यामुळे शरीरात होणा-या या मासिक बदलाविषयी अतिशय जागरूक असणे आवश्यक आहे. आपल्या रोजच्या धावपळीमध्ये या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि असंख्य आजारांना आमंत्रण मिळते.
आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ॠतुचर्या याप्रमाणे पाळीच्या काळात पाळण्यासाठी रजस्वाला परिचर्या ही दिलेली आहे. त्याचीही मदत नक्कीच घ्यावी. काळानुरुप बदल करुन त्या गोष्टी खालीलप्रमाणे पाळाव्यात.

पाळीच्या काळात पाळावयाचे नियम (साधारणतः)
१) पाळी आल्यावर स्त्रियांनी ३ दिवस पूर्ण ब्रम्हचर्य पाळावे.
२) चांगल्या गोष्टीविषयी चिंतन करावे, प्रसन्न रहावे.
३) पूर्ण स्वच्छता ठेवावी.
४) शक्यतो चटईवर / सतरंजीवर झोपावे.

आहाराचे नियम
१) आहारात शक्यतो भाकरी, फुलका, मुगडाळ, फळभाज्या खाणे.
२) गरजेप्रमाणे मध, साखर व गुळ हे गोड पदार्थ घेणे.
३) गाईचे दुध, तुप व ताक चालेल.
४) मसाले पदार्थात वेलची, शुंठी, काळे मिरे, हिंग, सैंधव घ्यावे.

आहारात टाळण्याचे पदार्थ
१) हरभरा डाळीचे पदार्थ, ब्रेड, फास्टफुड, पाव इ. आंबवलेले पदार्थ खाऊ नये.
२) मसूर, हरभरा, कडधान्य, वांगे, बटाटे, बडीशेप, काळे मीठ घेऊ नये.
३) म्हशीचे दुध, दही, तुप, खाऊ नये, खीर खाऊ नये.

कसे वागावे?
१) अंगाला तेल लावणे, दिवसा झोपणे, जागरण पूर्णपणे टाळावे.
२) जास्त श्रम करणे टाळावे. शारीरिक व मानसिक पूर्ण विश्रांती घ्यावी.
३) पाळीच्या काळात आहार व वर्तणूक योग्य नसल्यास त्याचा स्त्रियांच्या शरीरावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता असते. चिडचिडपणा, उदासिनता, चिंता, ताण या प्रकारचे त्रास होऊ लागतात. त्यामुळे स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी तरी या नियमांचा विचार करावा.
डॉसचिन गायकवाड–पाटील,औरंगाबाद
एम.डी., (आयुर्वेद)
(वरील लेखातील मते ही लेखकाची आहेत. वाचकांनी त्यानुसार वागण्याआधी स्वतः डॉक्टरांना विचारणा करावी. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपाय याविषयी आणखी माहिती पुढील लेखांत जाणून घेऊया.)
डॉ. सचिन गायकवाड–पाटील,एम.डी., (आयुर्वेद), औरंगाबाद
drsachin.ayu87@gmail.com

Comments

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद