इम्युनिटी क्लिनीक (Immunity Clinic)
रोग प्रतिकारशक्ती ही काळाची गरज आहे. सध्या सुरु असलेल्या साथीच्या आजारामध्ये हे विशेष करुन लक्षात येत आहे. उत्तम रोग प्रतिकारशक्ती हीच सध्या कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन समोर येत आहे. मानवी शरीर हे मोठे लढाऊ प्रवृत्तीचे आहे. शरीराबाहेरुन होणारा संसर्ग किंवा शारीरीक बिघाडामुळे निर्माण होणा-या आजाराशी मोठा जीकरीचा लढा देत असते. या कामात प्रतिकारशक्ती अतिशय म्हत्वाची ठरते, यामुळे प्रतिकारशक्तीला आजाराशी लढण्याची शक्ती असे देखील म्हणतात.
प्रतिकारशक्ती ही शरीरीक आजार बरा करण्याबरोबरच आजारावर प्रतिबंध
घालल्यासाठी देखील उपयोगी आहे. यामुळे भविष्यात शरीरीक आजार निर्माण होण्याचे प्रमाण
कमी होऊन निर्माण झालेला आजार लवकर आटोक्यात येतात व आजाराचे कोप्लीकेशन (Complication) टाळता येऊ शकतात.
यालाच आपण प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला (Prevention is better
than Cure) असे म्हणू शकतो.
परंतु, ही प्रतिकारशक्ती कशी वाढवायची?
यासाठी काय करावे?
काय खावे?
काय खाऊ नये?
कसे वागावे?
कसे वागु नये?
दिनचर्या कशी असावी?
शरीरात असणा-या आजारांचा प्रतिकार शक्तीवर काय परीणाम होतो?
त्यासाठी काय करावे?
वयस्क व्यक्तीने काय काळजी घ्यावी?
काय औषधी घ्यावी?
काय घेऊ नये?
अशा अनेक शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहेत.
या शंकाचे योग्य ते समाधान करण्यासाठी आपण हा इम्युनिटी क्लिनीक (Immunity Clinic) चा उपक्रम सुरु करत आहोत.
याठीकाणी
प्रतिकारशक्ती (Immunity) विषयी असणा-या सर्व शंका आपण निसंकोचपणे
विचारु शकता. तक्ष आयुर्वेदिय डॉक्टरां मार्फ़त या शंकांचे समाधान करण्यात येईल व आपणास योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल.
या संकटाच्या काळात रोग प्रतिकारशक्ती हीच आरोग्याची गुरुकील्ली आहे.
रोग प्रतिकारशक्ती विषयी आधिक माहीतीसाठी आजच संपर्क करा
डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.) आयुर्वेद -पुणे
श्री विश्वांकूर आयुर्वेद
मंजिरी निवास
हॉटेल लालाजी समोर
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी
नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद
शाखा:- बानेर - पुणे
Follow Us
Comments
Post a Comment