अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद
अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद दिवाळी जरी चार दिवसांपुरती असली तरी अभ्यंगस्नानाचे महत्व हे आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यभराचे आसते. आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून किमान एकदा तरी अभ्यंगस्नान करायलाच हवे. आयुर्वेद शास्रानुसार आणि भारतीय परंपरेनुसार अंगाला तेल लावून जिरवणे आणि उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ करणे याला अभ्यंगस्नान" असे म्हटले जाते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वात प्रथम अभ्यंगाला सुरुवात कधी होते माहिती आहे का ? जेव्हा हॉस्पिटल मधून छोटसं बाळ घरी येतं आणि आजी तेलाने मालिश करून छान गरम पाण्याची अंघोळ घालते आणि धुरी देते ना, इथेच बाळाला खर आयुर्वेदाची ओळख होते Baby soft skin हा शब्दच सगळं सांगून जातो. पण आयुर्वेदात अभ्यंग फक्त या दिवाळीच्या 5 दिवसात नव्हे तर रोज करायला सांगितले आहे. म्हणजे , " अभ्यंग " चा समवेश " दिनचर्या " या भागात वर्णन केला आहे . रोज सकाळी उठल्यावर तैलाने अभ्यंग करावा. अभ्यंगाने होणारे फ़ायदे अतिशय महत्त्वाचे आहे. अभ्यंग चा अर्थ काय ? स...